Home साहित्य जगत महामानव…!

महामानव…!

521
मना मना एक नाव
महामानव भीमराव
मन केव्हाचं पोचले
चैत्य भुमीस घे धाव
चित्र  चरित्र  पाहता
नेहमीचं येते आठव
ओठावर येते सहज
जय  भिम  गुंजारव
संघर्षांने आपल्याचं
चवदारतळ्यास चव
पुस्तकांपुढे आपणां
जेवण वाटले  बेचव
दीन  दुबळ्या वरती
लागला विशेष जीव
संविधान सर्वव्यापी
घातली सक्षम  नीव
कृषी कायदे तेव्हांचे
बळीराजाची कणव
स्थिती पाहता आज
भासे आपली उणीव
महानिर्वाण  होऊनि
आहा  इथेचं  सजीव
शतकानुशतके  राही
नाव विश्वात आजीव
– हेमंत मुसरीफ पुणे. 
  9730306996..