
रेणुकामाता कॉलेजची शिवानी देशमुख ठरली सुवर्णपदकाची मानकरी
प्रा , तनजीम हुसेन ,
चिखली : रेणुकामाता स्कुल व ज्युनियर कॉलेज भालगाव येथील कनिष्ठ महाविद्यालयातील विध्यार्थिनी कु .शिवानी कैलासराव देशमुख हिने गोवा येथे ऑक्टोबर २०२१ मध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करतांना ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवत शाळेच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला आहे ,
शिवानी देशमुखला डिसेंबर महिन्याच्या २९ तारखेला नेपाळ येथे होणा-या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी तिला मिळाली आहे,माजी कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत,रयत क्रांती संघटनेचे विदर्भाध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील, संस्थेच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई शेवत्रे, सचिव श्री.जगन्नाथ शेवत्रे , संचालक अजय शेवत्रे तसेच प्राचार्य श्री.संजय जाधव सर,बाजार समितीचे संचालक नितीन राजपूत,पं.दे.कृ.वि.चे सदस्य शेतकरी प्रतिनिधी विनायक सरनाईक,चिखली केमिस्ट संघटनेचे शहराध्यक्ष स्वप्नील तायडे,शेतकरी नेते तथा पंचायत समिती सदस्यपती उद्धव थुट्टे पाटील,शेतकरी नेते अनिल,वाकोडे,भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विक्की हरपाळे,भाजपा ता उपाध्यक्ष अनमोल ढोरे पाटील,युवा मोर्चा ता.अध्यक्ष संतोष काळे पाटील, येवता तंटामुक्ती अध्यक्ष अनिल चव्हाण,पत्रकार राजेश लोखंडे, आम्ही चिखलीकरचे संपादक छोटू कांबळे आदींनी शिवानी देशमुखचे कौतुक व अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या,तिला विद्यालयाच्या क्रीडा शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, यावेळी विकास शेवत्रे सर,आकाश पडघान सर,अरुण शेवत्रे सर,राम काचवाल सर , प्रदीप काकडे सर,संकेत चोपडा सर उपस्थित होते












































