Home महत्वाची बातमी धर्माला हात लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन – ...

धर्माला हात लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन – राजसाहेब ठाकरे

142

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया
मुंबई , दि. २३ :- “मी महाराष्ट्राचा” , मी मराठी देखील आणि हिंदू देखील आहे. मी धर्मांतर केलेलं नाही. माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मराठी म्हणून व धर्माला हात लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन असे राजसाहेब ठाकरे यांनी इशारा दिला आहे.

गोरेगाव येथील मनसेच्या महा – अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलत होते.

त्यावेळी त्यांनी मनसे हिंदुत्वाच्या दिशेने जात आहे त्या दृष्टीकोनातून राज साहेब ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. हिंदुत्वाच्या मार्गावर जाणार का? अशी चर्चा सुरु आहे. मी पहिल्या सभेतच सांगितलय की, देशाशी प्रामाणिक असलेले मुस्लिम आमचेच आहेत. आम्ही अब्दुल कलाम , झहीर खान , जावेद अख्तर यांना नाकारु शकत नाही असे राजसाहेब म्हणाले.

जावेद अख्तरांबरोबर ऊर्दू भाषेवरुन झालेल्या चर्चेचा किस्सा त्यांनी यावेळी सांगितला. ऊर्दू मुस्लिमांची भाषा आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं? ऊर्दू मुस्लिमांची भाषा नाही. बांगलादेश बंगाली भाषेसाठी स्वतंत्र झाल. ऊर्दूसाठी नाही. भाषा कुठल्याही एका धर्माची नसते तर ती त्या भागाची असते असे राजसाहेब म्हणाले.

रझा अकादमीच्या मोर्चाच्यावेळी आमच्या पोलिसांवर हात टाकला होता त्यावेळी मोर्चा काढणार पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना होता. हिंदी सिनेसृष्टीत पाकिस्तानी कलाकार धिंगाणा घालत होते. त्यावेळी त्यांना हाकलण्याचं काम मनसेनं केलं. त्यावेळी कोणी मला हिंदुत्वाच्या मार्गाने चाललोय हे विचारलं नाही असा सवाल राजसाहेब यांनी उपस्थित केला.