Home जळगाव शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुसुंबा येथे रक्तदान शिबिर संपन्न

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुसुंबा येथे रक्तदान शिबिर संपन्न

158

शरीफ शेख

रावेर , दि. २३ :- येथून जवळच असलेल्या कुसुंबा येथे दि. २३ जानेवारी रोजी शिवसैनिकांचे श्रद्धास्थान हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात येवून . त्यानिमित्त युवासेना तालुका प्रमुख श्री प्रवीण पंडीत यांच्या राहत्या गावात कुसुंबा येथे उद्या दि.२३ जानेवारी रोजी शिवसैनिकांचे आराध्य दैवत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४व्या जयंतीनिमित्त ” रक्तदान ” शिबीर शिवसेना व युवासेना परिवारा तर्फे आयोजित करण्यात आले होते , यामध्ये सर्वांनी रक्तदान करून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे. असे आवाहन युवासेना व शिवसेनेतर्फे करण्यात आले होते.
हेच औचित्य साधून यावेळी तालुका भरातील अनेक शिवसेना नेते, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता, यापैकी 55 युवा सेना कार्यकर्ते यांनी रक्तदान केले.

तसेच युवा सेना रावेर तालुका अध्यक्ष प्रविण पंडित, कुसुंबा गावांचे सरपंच सलीम तडवी, उपसरपंच संतोष महाजन, मुबारक तडवी, मुकेश पाटील, प्रविण महाजन, अशा अनेक कार्यकर्ते यांनी रक्तदान शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अनमोल सहकार्य केले.