
पशुपालक मालकांनी आठ दिवसा पूर्वी केली होती मागणी
अबब…पशुवैद्यकीय विभाग कुंभकर्ण झोपेत ..?
प्रतिनिधी:-(रवि आण्णा जाधव)
देऊळगाव राजा:-अंढेरा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी कायमस्वरूपी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी यासाठी अशी मागणी वारण वार परिसरातील पशु मालक करीत आहेत. तरी पण पशुवैद्यकीय विभाग जाणीवपुर्वक लक्ष देत नाही आशी नाराजी पशुपालक करीत आहे.
परिसरातील जनावरांच्या आरोग्यासाठी अंढेरा येथे श्रेणी एकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याची निर्मिती करण्यात आली आहे. या दवाखान्याला अंढेरा सह परिसरातील शिवणी आरमाळ, पाडळी, बायगाव, सावखेड नागरे,मेंडगाव पिंपरी आंधळे,सेवानगर यासह इतर खेडी जोडण्यात आली आहे.त्यामुळे पशु मालक दररोज आपल्या आजारी जनावरांना उपचारासाठी या दवाखान्यात येत असतात परंतु पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टर नसल्याने जनावरांना उपचारासाठी देऊळगाव मही येथे यावे लागते. अंढेरा येथे प्रभारी डॉक्टर असल्यामुळे आजारी जनावरांवर वेळेवर उपचार होत नाही त्यामुळे जनावरे दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येथील शेतकरी त्रास झाले आहे.त्यामुळे येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने कायमस्वरूपी डॉक्टरांची नियुक्ती करावी अशी मागणी होत आहे











































