Home मुंबई भवन्स ची नंदिनी माकणीकर बारावी विज्ञान शाखेतुन 91.16 टक्क्यांनी उत्तीर्ण

भवन्स ची नंदिनी माकणीकर बारावी विज्ञान शाखेतुन 91.16 टक्क्यांनी उत्तीर्ण

321

मुंबई दि (प्रतिनिधी) मुंबई येथील भवन्स महाविद्यालयात शिक्षण घेणारी नंदिनी माकणीकर 12 वि विज्ञान शाखेतून 91.96 टक्के गुणांनी उत्तीर्ण झाली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या शालेय जीवनात 18 तास अभ्यास करायचे असे तिच्या वाचनात आल्यामुळे आपल्या जीवनातला अधिक काळ तिने अभ्यासात देऊन बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन आजोबा रिपब्लिकन डेमोक्रॅटिक नेते दिवंगत ईश्वर कांबळे माकणीकर यांना शैक्षणिक श्रद्धांजली अर्पण आहे.

आई वडिलांनी नंदिनीला अभ्यास करता यावा यासाठी शैक्षणिक स्वतंत्र दिले तर आजी लताताई आधार म्हणून पाठीराखा ची भूमिका बजावली यामुळे बारावी परीक्षेत भरभरून गुण प्राप्त करण्यात यश आले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर व भीमकण्या राणी ताई यांचे कन्यारत्न वैद्यकीय क्षेत्रात भविष्य घडवणार असून समाजातील गरीब रुग्णांची तिची सेवा करण्याची इच्छा असल्याचा मनोदय मिस. नंदिनी माकणीकर हिने बोलून दाखवला.

जागतिक कीर्तीचे धम्मगुरु पूज्य भदंत विशुद्धानंद बोधी महाथेरा, पूज्य भदंत मैत्रेयघोष आयुपाल, पुझ्या भदंत शिलबोधी, भन्ते कश्यपली आदी शेकडो धर्मगुरू, शिक्षक, प्राध्यापक वर्ग, रिपाई नेते कनिष्क कांबळे सह विविध पक्ष, संघटना, संस्था राजकीय व सामाजिक नेते कार्यकर्त्यांनी स्वागत करून आशीर्वाद दिला तर नंदिनी च्या यशामुळे तिचे सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे, शुभेच्छा व अभिनंदनांचा तिच्यावर वर्षाव होत आहे.