Home विदर्भ कळंब येथे नरेगातुन ग्राम समृध्दी बुध्दीमंथन कार्यशाळा सपन्न

कळंब येथे नरेगातुन ग्राम समृध्दी बुध्दीमंथन कार्यशाळा सपन्न

91

रूस्तम शेख  – कळंब

यवतमाळ – सरस्वती बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक मंडळ राळेगांव यांच्या व्दारा कळंब पंचायत समिती हॉल मध्ये पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पदमाकर मडावि यांच्या अध्यक्षते खाली “मनरेगातुन ग्रामसमृध्दी ” बुध्दीमंथन कार्यशाळा सपन्न झाली .

या कार्यशाळेत मनरेगाचे नियोजन, कामाचा आढावा ,बजेट , मजुराचे ताळेबंद , याबाबत तसेच मनरेगातुन २६२ प्रकारचे कामे आपण आपल्या गावात सुरू करु शकतो या बाबत मार्गदर्शन करण्यात आले .

या कार्य शाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणुन वरोरा येथील श्री किशोर चौधरी अध्यक्ष विचार विकास संस्था , तर उदघाटक म्हणुन सामाजिक कार्यकर्ते अशोक उमरतकर तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन उपसभापती विलास राठोड , प स सदस्य महादेवराव काळे , रूस्तम शेख , देवेंद्र पडोळकर सहा कार्यक्रम अधिकारी नरेगा प स कळंब ,सहा गट विकास अधिकारी तुषार महाजन ,आशिष कुंभारे , विस्तार अधिकारी धर्माळे , दिगांबर गाडगे इ मान्यवर उपास्थित होते .

बुद्धीमंथन कार्यशाळेचे सुत्रसंचालन प्रमोद कांबळे, प्रास्ताविक गंगाधरराव घोटेकार ,तर आभार प्रदर्शन जयानंद टेभेंकर यांनी केले .
कार्यशाळा यशस्वी होण्या करीता प्रदिप कोरडे , स्वप्नील घोटेकार , महेंद्र धुर्वे इ अथक परिश्रम घेतले
या प्रसंगी तालुक्यातील बहुसंख्य सरपंच, उपसरपंच, रोजगार सेवक उपस्थित होते