Home बुलडाणा पत्रकार स्वप्नील शिंदे यांच्या सतर्कतेमुळे जखमी वानरास १५ तासांनंतर मिळाले प्रथम उपचार

पत्रकार स्वप्नील शिंदे यांच्या सतर्कतेमुळे जखमी वानरास १५ तासांनंतर मिळाले प्रथम उपचार

379

वनविभागाच्या हलगर्जीपणा वानराचा मृत्यू

नागणगाव वासीयांची जख्मी वनरावर पहारा

प्रतिनिधी – रवि आण्णा जाधव

देऊळगाव राजा :- येथून जवळच असलेल्या व वनविभाग देऊळगाव राजा यांच्या हद्दीतील अंढेरा बिट मध्येय येणाऱ्या नागणगाव येथे मुख्य वस्तीत ११जून शुक्रवारी सकाळी सात वाजता लिंबाच्या झाडाची वाळलेली फांदी मोडल्याने त्यावरील वानर झाडाखाली असलेल्या नालीत पडले व त्याच क्षणी सदर वानरावर कुत्र्याने हल्ला चढविला त्यात वानर गंभीर जखमी झाले.कुञ्यांनी हल्ला केल्याने वानरास मानेला गंभीर दुखापत झाल्याने अशा अवस्थेत गावकऱ्यांनी कुत्र्याच्या तावडीतून सोडवुन शेषराव गीते यांनी सदर माहिती पाडळी शिंदे येथील पत्रकार स्वप्नील शिंदे यांना दिली व स्वप्नील शिंदे यांनी सदर माहिती तात्काळ वनरक्षक जिवन बिल्लारी यांना दिली असता त्यांनी वनमजुर अशोक सानप यांना नागणगाव येथे पाठवून दिले. त्यावेळी वानर चवताळलेल्या अवस्थेत असताना सदर कर्मचारी दुपारी तीन वाजेपर्यंत घटनास्थळी थांबल्यावर तेथुन निघून गेले.ते रात्री ९वाजेपर्यंत परतलेच नसल्याने नागणगाव येथील युवकांनी पुन्हा सदर प्रकार पत्रकार स्वप्नील शिंदे यांच्या कडे सांगितल्या नंतर त्यांनी तात्काळ आपले सहकारी शिवशंकर शेळके यांच्या सह तात्काळ नागणगाव येथील घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांनी वनविभागाच्या प्रति त्यांच्या कडे तिव्र रोष व्यक्त केला.नागणगांव येथील गावकरी यांनी सदर जख्मी वानर याच्यावर कुत्रे हल्ला करू नये व वनविभागाचे कर्मचारी आता येतील! मंग येतील!बुलढाणा येथील टिम येईल व जख्मी वानरास पकडून उपचारासाठी टीम येणार या आशेवर बसले होते.परंतु वनविभागाच्या ढिसाळ कारभाराचा प्रत्यक्ष पत्रकार स्वप्नील शिंदे यांनी तात्काळ देऊळगाव राजा चे वनपरिक्षेत्र अधिकारी डूबे यांच्या शी संपर्क साधला असता त्यांच्या शी संपर्क न झाल्याने स्वप्नील शिंदे यांनी अंढेरा सर्कल मधील पत्रकार यांचे फोन नेहमीच टाळण्यासाठी माहीर असलेले वनपाल सुभाष कायंदे यांच्या शी संपर्क साधून बघितला असता त्यांनी फोन आज उचलून त्यांना पत्रकार स्वप्नील शिंदे यांनी सदर घटनास्थळी तात्काळ येऊन १४तास उलटूनही जखमी अवस्थेत असलेले वानर वनविभागाच्या बेजबाबदार पणामुळे गतप्राण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती.ही बाब सुभाष कायंदे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी वनविभागाच्या पथकासह तात्काळ नागणगाव गाठून सदर जखमी वानरास पाडळी शिंदे येथील युवक पत्रकार स्वप्नील शिंदे, शिवशंकर शेळके,यांच्या सह नागणगाव येथील शेषराव गीते,विठ्ठल मुंढे,बबन सानप,मारोती गीते,बबन मुंढे,उत्तम सानप,गजानन माणेकर,वैभव मुंढे,सुरेश मुंढे,बबन मुंढे व वनविभागाचे वनपाल कायंदे,वनरक्षक जिवन बिल्लारी व सहकारी यांनी सदर जखमी अवस्थेत असलेल्या वानरास वनविभागाच्या गाडीमध्ये टाकून दिले त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर जखमी अवस्थेत असलेल्या वानरास पशुधन अधिकारी अंढेरा यांच्या कडे रात्री ११वाजता प्रथम उपचार करून त्यानंतर सदर वानरास देऊळगाव राजा येथे नेले असता राञा दिड वाजता जख्मी वानर मृत्यू पावले.
सदर वानरास वनविभागाचा गलथान कारभारामुळे आपल्या प्राणांस मुकावे लागले.

“सदर प्रकाराबाबत जिल्ह्याचे उपवनसंरक्षक अधिकारी यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता सदर प्रकरणाची मला माहिती घेऊ द्या नंतरच आपल्याशी बोलतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली”!
अक्षय गजभिये
उपवनसंरक्षक अधिकारी.बुलढाणा