Home विदर्भ गोठा जळून दोन बैल ठार

गोठा जळून दोन बैल ठार

846

तर वैरणासह शेती साहित्याची राखरांगोळी: अंदाजे दोन लाखाचे नुकसान

ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकर्‍यावर कोसळले संकट

तळेगांव (शा.पं.) : – तळेगाव पोलीस स्टेशन च्या हद्दीत येणाऱ्या भारसवाडा येथील मधुकरराव सुर्यभानजी पुंड यांच्या सर्वे नं. १५५/१ माैजा भारसवाडा शेतातील गोठ्याला आग लागून दोन बैल मृत्य मुखी पडले.तसेच बैलांना चारण्या करिता चना व तुरीचे कुटार 15 गोनी तसेच शेती साहित्य व शेती पूरक वस्तू असे साहित्य जळून खाक झाल्याने त्यांचे अंदाजे दोन लाख रुपयाचे नुकसान झाले. सध्या शेतीच्या खरिप हंगामातील मशागतीसह पेरणीस सुरुवात झाली असुन अशातच त्यांची बैल जोडी जळून मृत्यु मुखी पडल्या मुळे शेतीची कामे कशी करायची हा यक्ष प्रश्न त्यांचे पुढे पडला आहे. या घटनेची माहिती तळेगाव पोलीस यांना दिल्यावर घटनास्थळी पोहचून मृत बैलांचे शव विच्छेदन करण्याकरिता पशू वैद्यकीय अधिकारी प्रणाली कांबळी आष्टी यांनी घटना स्थळावर पोहचून मृत बैलांचा शव विच्छेदन करून बैलांचा दफन विधी पार पाडला. तर तलाठी ए.डी. जगताप यांनी घटनास्थळाची पाहणी करुन झालेल्या नकसानीचा अहवाल तयार करुन तहसीलदार आष्टी यांना सादर केला. नक्की आग कशा मुळे लागली हे मात्र बातमी लीहेस्तोवर माहित पडले नाही. तळेगाव पोलीसांनी घटनेची नोंद घेतली असुन पुढील तपास जमादार आशिष चव्हाण.मनोज आसोले.देवेंद्र गुजर हे करीत आहे.