Home विदर्भ पती तुरूंगात, मुलीचे लग्न पुढे ढकलले, पत्नीची आत्महत्या…!

पती तुरूंगात, मुलीचे लग्न पुढे ढकलले, पत्नीची आत्महत्या…!

622
0

अकोला / पातूर – पातूर तालुक्यातील चांनी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जांब येथील रामचंद्र लठाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी चांनी पोलिसांनी एम पी डी ए अंतर्गत कार्यवाही केली होती. या कार्यवाही नंतर सदर रामचंद्रला एक वर्षासाठी तुरूंगात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

जेव्हा ही कारवाई करण्यात आली, त्या दिवसापासून अवघ्या काही दिवसांवर या इसमाच्या मुलीचे लग्न ठरले होते. परंतु मुलीचे वडील पोलिसांच्या कारवाईत तुरुंगात गेल्याचे कळल्यानंतर मुलीचा विवाह पुढे ढकलण्यात आला. अशा परिस्थितीत सदर इसमाच्या पत्नीने या सर्व घटनांची धास्ती घेऊन शनिवारी दुपारी आत्महत्या केली.

ज्योती रामचंद्र लठाड, वय 35, असे या महिलेचे नाव असून गावाजवळच असलेल्या एका जंगलात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ही बाब समोर आल्यानंतर खळबळ निर्माण झाली. माहिती मिळताच चांनी पोलिस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याचे काम पोलीस करीत आहेत.याप्रकरणी चांनी पोलिसांनी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

Previous articleपोलीस मित्र व सामाजिक कार्यकर्ते धनराज खर्चान व त्याच्या सहकारी मंडळीने वाचविले वन्यप्राणी( नीलगाय) रोईचे प्राण
Next articleपत्रकार स्वप्नील शिंदे यांच्या सतर्कतेमुळे जखमी वानरास १५ तासांनंतर मिळाले प्रथम उपचार
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.