Home मराठवाडा अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांची कारवाई

अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांची कारवाई

179

गोदावरी नदीच्या पात्रात गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून दि.१ जून रोजी पहाटे ४ वाजता अचानक छापा मारत अवैधरित्या गौण खनिज वाळूने भरलेल्या दोन ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई केली.यावेळी सदर ट्रॅक्टरचे चालक हे ट्रॅक्टर जागीच सोडून पळून गेले.

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

याबाबत माहिती अशी की,डोमलगाव शिवारात पोलीस उपनिरीक्षक कोळासे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून गोदावरी नदीच्या पात्रात काही ट्रॅक्टर हे अवैध रित्या वाळूचा उपसा करत होते.यावेळी २ पंच बोलावून माहिती मिळालेल्या ठिकाणी पोलिसांनी अचानक छापा मारला असता तेथे स्वराज ७४४ एक्स टी कंपनीचे लाल रंगाचे हेड असलेले ज्याचा इंजन नं.ईएक्स ४००१/एसडीडी १३६९ असा असून त्यासोबत विना क्रमांकाची ट्रॉली ज्यामध्ये १ ब्रास वाळू व महिंद्रा ५८५ डीआय कंपनीचे लाल रंगाचे हेड असलेले ज्याचा इंजन नं. एनएचएफ६सीएई०१२८ असा असून त्यासोबत बिना क्रमांकाची ट्रॉली ज्यामध्ये अंदाजे १ ब्रास वाळू असा एकूण १२ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक गजानन कौलाशे यांनी दोन पंचासमक्ष सर्च लाईटच्या प्रकाशात जप्ती पंचनामा करून ट्रॅक्टर व गौण खनिज वाळूने भरलेले ट्रॉली याचा पंचांसमक्ष तपास कामी ताब्यात घेऊन पोलीस चौकी शहागड येथे लावण्यात आले.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक विनायक देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख,पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ,पोलीस उपनिरीक्षक गजानन कौलाशे,पोलीस अमलदार उदय पाटोळे,महेश तोटे,चालक गणेश मुंडे, गृहरक्षक दलाचे जवान कणके व राठोड यांनी केली आहे.