Home विदर्भ पत्रकारांनी वर्धा जिल्हाधिकारी यांच्या आरोपाला दिले प्रतीउत्तर , केली महसुल विभागाची मदत,...

पत्रकारांनी वर्धा जिल्हाधिकारी यांच्या आरोपाला दिले प्रतीउत्तर , केली महसुल विभागाची मदत, चोरट्यावाळुचा पकडला ट्रक

209

वर्धा / आर्वी,दि.३०:- येथील नगर परिषदेमध्ये झालेल्या चर्चेत वर्धेच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी मोबाईल वर चित्रफित काढुन वाळु माफीया पर्यंत पोहचेल अशी व्यवस्था करतात आणी आपली तुमडी भरतात असा आरोप पत्रकारांवर लावला होता. येथील पत्रकारांनी त्याच दिवशी रात्री चोरट्या वाळुचा ट्रक पकडण्याकरीता महसुल विभागाला मदत करुन याला प्रतिउत्तर दिले.

वर्धा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार ह्या शनिवारी येथील जळालेल्या तहसील कार्यालयाच्या इमारतीची पाहणी करण्याकरीता व कोराना विषयी आढावा घेण्याकरीता आल्या होत्या. यावेळी त्यांनी येथील नगर परिषदेच्या सभागृहात बैठक सुध्दा बोलावीली होती. पत्रकारांनी सुध्दा माहिती घेण्याच्या दृष्टिने त्यांना वेळ मागीतला. त्यांनी वेळ सुध्दा दिली. यावेळी वाळु तस्करीवर चर्चा सुरू असतांना वाद निर्माण झाला आणी त्यांनी मोबाईल वर चित्रफित काढुन वाळु माफिया पर्यंत पोहचेल अशी व्यवस्था करतात आणी आपली तुमडी भरतात असा आरोप या चर्चे दरम्यान पत्रकारांवर लावला. पत्रकारांनी हा आरोप खोडुन काढण्याकरीता वाळुची खुलआम होत असलेली तस्करी उघडी पाडण्याचा निर्धार केला. त्याच रात्री येथील शिवाजी चौक ते गांधी चौक या वरदळीच्या मुख्य मार्गावरील टावरी जनरल स्टोअर्स समोर एम.एच. ३२ एजे ५०२५ या क्रमांकाचे वाहन चोरीची वाळु खाली करतांना दिसले. या वाहनाच्या चालकाकडे वाळु वाहतुकाचा परवान तर नव्हताच शिवाय खनीज महसुल सुध्दा भरल्याची पावती नव्हती.
परिणामी येथील तहसिलदार विध्यासागर चव्हाण यांना भ्रमण ध्वनीवरुन याची माहिती दिली. नायब तहसीलदार विनायक मगर व अमोल कदम हे पोहचले आणी त्यांनी रेती जप्तीची कारवाई करुन वाहन येथील तहसील कार्यालयात लावले असुन पुढे काय कारवाई होते याकडे पत्रकारांचे व नागरिकांचे लक्ष लागले आहे.