Home बुलडाणा चक्क दारू अन मटणाची लाच घेतांना मंडळ अधीकारी व तलाठ्यास अटक ,

चक्क दारू अन मटणाची लाच घेतांना मंडळ अधीकारी व तलाठ्यास अटक ,

1156
0

 

 

सर्वत्र चर्चा ,

 

अमीन शाह

प्लॉटची नोंद घेऊन त्याची फेरफार देण्यासाठी दहा हजार रुपये नगदी घेऊनही दारू व मटणाची पार्टी घेणाऱ्या लाचखोर मंडळ अधिकारी व

तलाठीला बुलडाणा एसीबीच्या पथकाने दारू मटणची मेजवानी करताना अटक केली आहे . या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे . या बाबत प्राप्त माहिती अशी की , खामगाव तालुक्यातील शिरला नेमाने येथील रहिवासी 42 वर्षीय तक्रारदाराने बुलडाणा एसीबीकडे येऊन तक्रार नोंदवली की , लाखनवाडा येथे कार्यरत मंडळ अधिकारी विलास साहेबराव खेडेकर वय 52 वर्ष रा . गजानन कॉलनी खामगाव व शिरला नेमाने येथे कार्यरत तलाठी बाबुराव उखर्डा मोरे वय 36 वर्ष रा . किन्ही महादेव खामगाव यांनी तक्रारदारच्या भावाच्या नावाने खरेदी केलेल्या प्लॉटची नोंद सातबारावर नोंद घेऊन फेरफार नक्कल देण्यासाठी दहा हजार रुपये व दारू मटण पार्टीची मागणी केली व 10 हजार रुपये यापूर्वीच स्वीकारले , अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर बुलडाणा एसीबीने ट्रॅप लावला . दिनांक 28 मेच्या रात्री खामगाव तालुक्यातील पिंपरी देशमुख शिवारात असलेल्या प्रल्हाद चव्हाण यांच्या शेतातील झोपडी समोर मंडळ अधिकारी विलास खेडेकर व तलाठी बाबुराव मोरे या दोघांना दारू व मटणवर ताव मारताना अटक केले आहे . सदर सापळा कारवाई बुलडाणा एसीबीचे पो.उपअधिक्षक संजय चौधरी यांच्या नेतृत्वात पो.निरीक्षक सचिन इंगळे पोलीस नाईक विलास साखरे , प्रवीण बैरागी , मोहम्मद रिझवान . विनोद लोखंडे , अझरुद्दीन काझी , चालक नितीन शेटे , शेख अर्शद यांनी केली आहे .