Home विदर्भ लोकनेते बबलू भाऊ देशमुख युथ फाउंडेशन व उपकेंद्र कांडली आरोग्य विभाग तर्फे...

लोकनेते बबलू भाऊ देशमुख युथ फाउंडेशन व उपकेंद्र कांडली आरोग्य विभाग तर्फे अंबाडा येथे कोरोना लसीकरण संपन्न

54
0

अमरावती – अचलपूर तालुक्यातील येणाऱ्या अंबाडा कंडारी येथे 28 मे रोजी लोकनेते फाउंडेशन व आरोग्य विभाग तर्फे पहिल्या टप्प्यात 100 लसीचे लसीकरण करण्यात आले गावातील विकास व्हावा तसेच जिल्हास्तर तसेच तालूका स्तरावर प्रत्येक गावात विकास कार्य व्हाव्हे याच बांधिलकीनि ने फाउंडेशन प्रेरणास्थान मा,श्री, बबलू भाऊ देशमुख जिल्हा परिषद अध्यक्ष,व मार्गदर्शक माजी सरपंच मा,विजयजी बेलसरे मा,निलेश डांगे तथा अक्षय कुरळकर व सर्व सहकारी यांच्या विनंती वरून मा,अक्षय कात्रे यांनी लोकनेते बबलू भाऊ देशमुख युथ फाउंडेशन ची सुरवात म्हणून एक पाऊल पुढे घेतले आहे सामाजिक व जनसेवीची भावना जोपासत काल गावातील 45 वर्षावरील लोकांन करता कोरोना लसीकरण करण्यात आले, आपले कोरोना पासून बचाव व सुरक्षा व्हावी या दृष्टिकोनातून गावातील ग्रामस्थांनी लसीकरण करून घेतले आहे,कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर नेहमी उपय योजना करण्यात येतात, सर्वांनी लसीकरण करणे आवश्यक असल्याने त्याच अनुषंगाने शासनानी दिलेल्या सर्व अटी व नियमांचे पालन करून अतिशय काटेकोरपणे अंबाडा कंडारी येथेली ग्रामस्थांनी लसीकरना ला चांगले सहकार्य केले या यामध्ये लसीकरनाचा कार्यक्रम पार पाडण्यारता ग्रामपंचायत ग्रामसेवक,सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी,व सर्व आरोग्य विभाग अंगणवाडी सेविका आधी इत्यादी उपस्थितीत होते सर्वांनी आपली काळजी घ्यावी विनाकारण घराबाहेर फिरू नये काही दुसऱ्या टप्प्यात लवकरच लसीकरण होणार आहे कोणीही लसीकरणापासून वंचित राहू नये कोरोना लस सुरक्षित आहे सर्वांनी मिळून कोरोना व्हायरसला रोखायचे आहे.