Home पुणे पती पत्नीचा कडाक्याचा भांडण झालं अन , विपरितच घडलं ???

पती पत्नीचा कडाक्याचा भांडण झालं अन , विपरितच घडलं ???

435
0

 

 

मन सुन्न करणारी घटना

अमीन शाह ,

 

 

नवरा बायकोच्या भांडणात दोन लहानग्यांना जीव गमवावा लागल्याची मन सुन्न करणारी घटना बारामतीतील पिंपळी गावात घडली आहे. हि घटना शनिवारी घडली. दिव्या सूर्यवंशी आणि शौर्य सुर्यवंशी अशी मृत मुलांची नाव आहेत. एकाचं वय ४ तर एकाचं वय २ वर्षे इतकं आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेच्या दिवशी अंजली आणि अतुल या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. त्यामुळे अंजली सूर्यवंशी यांच्या संतापाचा पारा चढला. त्यानंतर कशाचीही तमा न बाळगता रागाच्या भरात अंजलीने विहीरीत उडी घेतली. आईने विहिरीत उडी घेतली हे लहानग्यांनी पाहिलं. त्यानंतर त्यांनीही आई कुठे गेली हे पाहण्यासाठी उडी घेतली. या घटनेनंतर पती अतुलने त्यांना वाचवणयासाठी तात्काळ विहिरीत उडी घेतली. पत्नी अंजलीला वाचवण्यात त्याला यश आलं. मात्र दोन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून जीव गेला. दोन्ही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहेत.
क्षुल्लक रागातून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. या मृत्यूप्रकरणी बारामती शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.