Home मुंबई अजून कोणासोबत फसवणूक झाली आहे अश्यांनी संपर्क साधावा.:- डॉ. राजन माकणीकर

अजून कोणासोबत फसवणूक झाली आहे अश्यांनी संपर्क साधावा.:- डॉ. राजन माकणीकर

99
0

मुंबई , (प्रतिनिधी) –  आकृती हब टाऊन विकासक विमल शहा व त्याचा महादलाल मूर्जी पटेल यांनी अजून कोणाची फसवणूक केली असेल अश्या पीडितांनी आमच्याशी संपर्क करावा असे आवाहन विद्रोही पत्रकार पँथर डॉ राजन माकणीकर यांनी केले आहे.

एमआयडीसी नंतर हरी नगर शिवाजी नगर व साई वाडी येथील अनेक पुरावे व लिखित तक्रारी आल्या असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक, सम्यक महाराष्ट्र न्यूज व सम्यक मैत्रेय फौंडेशन या एन.जी.ओ चॅनेल व पक्षाच्या माध्यमातून एसआरये प्रकल्पतील पीडितासाठी व्यापक व संविधानिक लढा दिला जात आहे.

लाभार्थी असूनही प्रत्यक्ष लाभ न मिळालयांनी रिपब्लिकन भवन येथे कॅप्टन श्रावण गायकवाड यांची भेट घेऊन आपली तक्रार नोंदविण्याची विनंती आंदोलनाचे आयोजक प्रायोजक व संयोजक डॉ राजन माकणीकर यांनी केली आहे.

साईवाडी येथे मंजूर चटई क्षेत्रफळ कापून प्रत्येकी 30 हजार रुपये वाटप केले. परिसरातील नवतरुणाईला विविध उत्सवाच्या नावावर पैसे देऊन व्यसनाधीन बनवण्याचे कुटील कारस्थान महादलाल मुरजी पटेल व विकासक शाह करत आहे.

हरी नगर शिवाजी नगर परिसरात आजही मूळझोपडी धारकांना सदनिका देण्यात आल्या नसून शेकडो प्रकल्पाशी संबंध नसलेल्या लोकांना येथे सदनिका विकल्या आहेत, पात्र झोपडीधारक आजही बेघर असून आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

आंबेडकर नगर, हरी नगर शिवाजी नगर येथे आजही पाणी पुरवठा सुरळीत नसून टँकरने पाणी पुरवले जात आहे. यामुळे नागरिकांचे बेहाल झाले आहेत.

मुरजी पटेल विमल शहा आणि संबंधित एमआयडीसी व महा पालिका अधिकारी यांनी प्रकल्पात संगनमताने महाघोटाला केला असून या सर्वांना एकत्र घेऊन मुरजी पटेल या मास्टर माईड महादलालाच्या घरावर मोर्चा, विकासक विमल शहा ला घेराव आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशी साठी अनुक्रमे एमआयडीसी व महापालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचे आयोजन करण्यात येत आहे.

संबंधित विषयी अन्य काही तक्रारी असतील तर त्वरेने 9004545045 या क्रमांकावर व्हाट्सअप्प कराव्यात आम्ही जनांदोलनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या हक्कासाठी लढा उभारत आहे. असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी केले आहे.