Home मुंबई बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून हिंदू भंडारी युवकाचे बौद्ध धम्मात पदार्पण

बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून हिंदू भंडारी युवकाचे बौद्ध धम्मात पदार्पण

177

मुंबई ,  (प्रतिनिधी) – वैशाखी बौद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून हिंदू धर्मातील भंडारी जातीच्या युवकाने शेकडो समुदायासमोर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, पूज्य भदंत संघप्रिय व पूज्य भदंत शिलबोधी यांनी धम्माची दीक्षा दिली.

30 वर्षीय हिंदू धर्मातील भंडारी जातीच्या श्री. किरण राघु तिरवडेकर नामक युवकाने हिरानंदानी मुंबई येथील जयभीम नगर बुद्ध विहारात धम्मदीक्षा घेतली.

हिंदू धर्मातील जुनाट रूढी परंपरा व बुरसटलेल्या विचारापासून मूलतः चिडलो होतो, लहान पनापासून ते तारुण्यापर्यंत ग्रासून गेलो होतो, मात्र: धर्मांतर करून विज्ञानाची कास धरू शकतो हे मित्रांकडून माहिती झाले म्हणून बुद्ध धम्म आणि संघाच्या वाटेवर मी मार्गक्रमन करत असल्याची प्रतिक्रिया धर्मांतरित किरण ने आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.

मालवणच्या किरण तिरवडेकर ने बौद्ध धम्मात प्रवेश केल्याने त्यांचे सर्व स्तरातून स्वागत होत असून असंख्य बौद्ध धम्मीयांनी रोटी बेटी व्यवहार करण्याचे बोलून दाखविले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कनिष्क कांबळे, राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर, कॅप्टन श्रावण गायकवाड यांनी किरनच्या निर्णयाचे स्वागत केले व भविष्यात लागणाऱ्या मदतीचे आश्वासन दिले.