Home जळगाव खिर्डी येथील शिक्षक प्रविण धुंदले यांनी वाचवले विजेच्या धक्यांतुन वृद्धांचे प्राण

खिर्डी येथील शिक्षक प्रविण धुंदले यांनी वाचवले विजेच्या धक्यांतुन वृद्धांचे प्राण

488

रावेर (शरीफ शेख)

तालुक्यातील खिर्डी बुद्रक येथील अभिषेक भास्कर पाटील माध्यमिक विदयालयातील शिक्षक प्रविण धुंदले यांनी शिक्षक कॉलनीतील त्यांच्याच घराशेजारील राहणाऱ्या सुरेश लालचंद तावडे वय (60 ) यांना बुद्धपोर्णिमेच्या दिवशी जीवनदान दिले आहे दोन दिवसापासुन शिक्षक कॉलनी परीसरातील ट्रासफार्मर जळला असल्याने येथील नागरीक रात्रभर अंधारात होते विज गेल्याने वाढत्या उष्णते मुळे उकाळा झाल्यामुळे शिक्षक कॉलनी परीसरातील दुसरे ट्रासफार्मर सुरु होते त्यामुळे काही भागात विजपुरवठा सुरळीत सुरु होता त्यामुळे सुरेश तावड़े यांनी आपल्या शेजारील घरातुन विज कनेक्शन जोडले संध्याकाळी विज केबल घरात जोडत असतांना विज प्रवाह सुरू असतांना त्यांच्या हातात चालू केबल पकडली गेली त्यामुळे त्यांना विजेच्या वायर हाताला चिकटली त्यामुळे त्यांनी आरोळ्या मारल्या तेवढयात शिक्षक प्रविण धुंदले यांनी जीवाची पर्वा न करता लाकडी काठीणे चालू विजपुरवठा असलेली केबल बाजुला सारली तेवढयात सुरेश कोळी जमीनीवर पडले तीन मीनटाच्या शॉक मुळे त्यांचा श्वासोश्वास बंद पडला रफीक शेख यांनी त्यांच्या नाकातोडांत फुंका मारल्यामुळे त्यांचा श्वास पुन्हा सुरु झाला त्यामुळे कोळी हे शुध्दीवर आले लगेच डॉक्टर ना बोलवून त्यांच्यावर उपचार केले यांत कोळी यांच्या हाताला विजेच्या धक्याने दोन मोठया जखमा झाल्या असुन ते सुखरूप या धक्यांतुन बचावले आहे शिक्षक प्रवीण धुंदले यांनी जीवाची पर्वा न करता सुरेश कोळी यांचे प्राण वाचवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
————————–
ऐन बौद्ध पोर्णिमेच्या दिवशी गौतम बुद्धांनी दिलेल्या शिकवण मी आचरणात आणून सुरेश कोळी यांचे विजेच्या मोठया धाक्यांतुन माझ्या जीवाची पर्वा न करता मी त्यांचे प्राण वाचवल्याचा मनस्वी आनंद वाटतो
शिक्षक प्रविण धुंदले