Home मराठवाडा डॉक्टर च्या घरी सोन्याचे दागिने लाखो रुपयांची चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास शिताफीने...

डॉक्टर च्या घरी सोन्याचे दागिने लाखो रुपयांची चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास शिताफीने अटक

156

अब्दुल कय्युम

औरंगाबाद , दि. २० :- सिडको एन-४ परिसरातील सेवानिवृत्त डॉक्टरांच्या बंगल्याचा दरवाजा फोडून ७७ तोळ्याचे सोन्याचे दागिने व पावणेपाच लाखांची रोकड लांबविण्यात आली होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. हा चोरटा परिसरातील एका बंगल्याच्या पुंडलिकनगर पोलिसांनी परिसरातील सीसी टिव्ही फुटेज हस्तगत केले होते. नगर पोलिसांच्या हातातून निसटताच मागावर असलेल्या पुंडलिकनगर पोलिसांच्या पथकाने रेकॉर्डवरील चोराला पकडले. सय्यद सिकंदर सय्यद इमरान (३५, रा. पुरग्रस्त कॉलनी, बीड) असे त्याचे नाव आहे.
मुळचे लातूरच्या अहमदपुर तालुक्यातील हडोळती येथील सेवानिवृत्त शल्यचिकित्सक डॉ. नामदेव जी. कलवले (६७, रा. एफ-१, बी-सेक्टर, एन-४, सिडको) हे खासगी कार्यक्रमानिमित्त कुटुंबियांसह २८ डिसेंबर २०१९ रोजी मुंबईला गेले होते. त्यावेळी त्यांनी बंगल्यात कामाला असलेल्या नोकरांना स्वच्छतेचे काम करण्याचे सांगितले होते. तर महिलेकडे कंपाउंडच्या गेटची चावी दिली होती. २९ डिसेंबर रोजी सकाळी महिला स्वच्छतेचे काम करण्यासाठी बंगल्यात गेली. तेव्हा मुख्य दरवाजासमोरील ग्रीलचा दरवाजा तिला तुटलेला दिसून आला. त्यामुळे तिने चोरी झाल्याचा संशय व्यक्त करुन कलवले यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर पुंडलिकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी बंगल्यातील सात खोल्यांमधील दरवाजाचे लॅच लॉक उघडून कपाटांमधील ७७ तोळे सोने व चार लाख ७९ हजाराची रोकड लंपास झाल्याचे डॉ. कलवले यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले होते. त्यापैकी ७६ तोळे सोने वडिलोपार्जित असल्याचेही ते म्हणाले होते.

सीसी टिव्हीत अडकला होता……

दरवाजाची जाळी काढून आत शिरलेल्या सिकंदरने पहिल्या व दुस-या मजल्यावर असलेल्या सात बेडरुमपैकी तीन रुम उघडून त्यातील ७७ तोळ्याचे सोने आणि पावणेपाच लाखांची रोकड लांबविली होती. तो परिसरातील एका बंगल्याच्या सीसी टिव्हीत कैद झाला होता. पहाटे तीनच्या सुमारास त्याने बंगल्यात प्रवेश केल्याचे त्यावरुन निदर्शनास आले होते.

असा लागला सुगावा….

डॉ. कलवले यांच्या बंगल्यात सिकंदरनेच चोरी केल्याची माहिती खबरीने पुंडलिकनगर पोलिसांना दिली होती. त्यावरुन पोलिसांनी त्याच्या नगरमधील बायकोची कसून चौकशी केली. तिला सिकंदरला संपर्क साधण्याचे सांगण्यात आले. बायको त्याच्याशी बोलत असतानाच पोलिसांचा आवाज ऐकूण त्याने शरण येत असल्याचे सांगितले. पण त्यानंतर त्याने मोबाईल बंद करुन ठेवला. पोलिसांनी तांत्रिक दृष्ट्या शोध घेऊन त्याला पुणे-नगरदरम्यान असलेल्या एका ऊसाच्या शेतात पकडले. ही कारवाई उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक पोलिस आयुक्त रविंद्र साळोखे, सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे, जमादार रमेश सांगळे, दीपक जाधव, बाळाराम चौरे, विलास डोईफोडे, रवि जाधव, जालिंदर मांटे यांनी केली.