Home विदर्भ आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुर्गम व शेतात जावून दिला पोलिओ डोज.!

आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुर्गम व शेतात जावून दिला पोलिओ डोज.!

196

सौ. पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. २० :- राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र गौळ अति दुर्गम भागात व तिन कि.मी.अंतरावर असलेल्या शेतात मेंढपाळ वसाहत आणि गिट्टी खदान मजूर वसाहत येथे जावून आरोग्य सेवक दिलीप उटाणे औषध निर्माण अधिकारी तुषार धाञक माधव कातकडे सतिश जगताप गणेश चंदेल संतोष चौधरी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकाने ० – ५ वर्षे बालकांना पोलिओ डोज दिले .

अति दुर्गम असलेला बहादरपूर येथे जाण्यासाठी रस्ता नसल्याने आरोग्य कर्मचारी नेहमीच शेतातून व दोन कि मी नदीच्या किनाऱ्याने वाट काढत जावे लागते .अशा परिस्थिती मध्ये जावून पारधी बेडा बहादरपूर येथे १५ बालकांना तर मेंढपाळ व रेल्वे लाईन गिट्टी खदान कामगार वसाहत येथे जावू ३५ बालकांना पोलिओ डोज देण्यात आले.
गौळ परिसरात २४ बुथ असून २ मोबाईल टिम आहेत . विशेष म्हणजे आशा व अंगणवाडी सेविकांचा सेविका व मदतनिस यांचा सहभाग मोठा असून वैद्यकीय अधिकारी डॉ प्रज्ञा तिवसकर डॉ कोमल कठाणे डॉ चौधरी आरोग्य सहाय्यक सविता फरताडे शरद डांगरे दिलीप उटाणे यांच्या मार्गदर्शनात पल्स पोलिओ मोहिम राबविली जात आहे. नागरीकांनी सहकार्य केल्या मुळे आभार व्यक्त करण्यात आले.