Home महत्वाची बातमी बचत गटाचे पैशे घेऊन महिलांची फसवणूक गुन्हा दाखल…!

बचत गटाचे पैशे घेऊन महिलांची फसवणूक गुन्हा दाखल…!

68
0

अब्दुल कय्युम

औरंगाबाद , दि. २० :- बचतगटाच्या देखरेखी साठी कामावर ठेवलेल्या महिलेने, बचगटातील महिलांच्या नावे प्रत्येकी 20 हजार रुपये कर्ज काढुन त्यातील अर्ध्या पैशांवर म्हणजे 80 हजार रुपयांवर डल्ला मारल्याची बाब डिसेंबर 2019 रोजी समोर आली होती.
प्रकरणात बचतगटाच्या उर्वरित महिलांनी वारंवार पैसे परत करण्याची मागणी केली असता सदर संशयीत महिलेने पैशांची परतफेड न करता उलट त्यांच्यावर सावकारिचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. प्रकरणात राजश्री महिला बचत गटाच्या अध्यक्ष रिता अंकुश कुर्‍हाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन संशयीत आरोपी अनिता सोमीनाथ चव्हाण (रा. मुकुंदवाडी ) हिच्या विरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार मनगटे करित आहेत.