Home साहित्य जगत बरं झाल देवा….. “मला कोरोना झाला”

बरं झाल देवा….. “मला कोरोना झाला”

632

 

बरं झाल देवा…..
मला कोरोना झाला |
आयुष्याचा आलेला,..
सगळा माज निघुन गेला ||
म्हनीत होतो नेहमीच मी,
माझी गाडी,आंन माझा बंगला |
पन जवा बसलो आम्बुलन्समधी
आख्हा जीव उशाला टांगला ||
गाडी राहिली..बंगल्याम्होरं …
आन रस्ता दिसेनासा झाला,
बरं झाल देवा…मला कोरोना झाला…|| 1

प्रत्येक खोकल्याच्या उबळीनिशी
केली कर्म आठवत होती..|
प्रत्येक अडकनारया श्वासासंगे,
माणुसकीची जान साठवत होती
….. पुण्यसंचय आला संपत ..
आणी ऑक्सीजन शॉर्ट झाला,|
तेंव्हा कुठ..देवा..तुझ्यावर भरोसा आला..||
बरं झाल देवा…मला कोरोना झाला…….2

होती पैशांची मस्ती..
आनं पदाचीबी गुरमी |
सगळं संपल देवा आता
आलीया पुरती नरमी..||
जवा आता मिळालाय,
गरिबा शेजारी खाट.|
तवाच माझा जिरलाय |
आता समदा थाट ||
सगळ आठवुन आता |
जीव घाबरा झाला ||
बर झाल देवा…मला कोरोना झाला ||| 3

नाही दिली कोणा गरिबा कधी,
रुपया आणीक दमडी ..|
इथं सुयांच्या भोकानी,
थकून गेलीया चमडी ||
पै-पै कमावलेला,पैसा ना कामी आला |
बर झाल देवा…मला कोरोना झाला || 4

खर सांगतो…मित्रांनो आता,
पैसा,पद आणी खोटी प्रतिष्ठा,
यात काही दम नाही……|
कोरोनाच्या बेडवर मात्र फक्त,
प्रेमाचं व्हेंटीलेटरच कामी येई ||
नात्यांमधील ऑक्सिजन कधी,
कमी होऊ देऊ नका |
मैत्रीच्या ऑक्सिमिटर मधले,
बोट कधी सोडवु नका ||