Home महत्वाची बातमी जवायाने सासूला पळून आणले अन विपरितच घडले , ???

जवायाने सासूला पळून आणले अन विपरितच घडले , ???

1432
0

 

जवायाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या ,

अमीन शाह ,

लग्न झाल्यानंतर बायकोपेक्षा सासू आवडल्यामुळे एका तरूणाने चक्क सासूसोबत अफेअर केले. त्यानंतर सासूला कर्नाटकमधून आणून पुण्यात संसार थाटला. आठ महिने संसार केल्यानंतर मात्र, रोजच्या वादावादीला कंटाळून जावयाने ओढणीने सासूचा गळा आवळून खून केला. ही धक्कादायक घटना शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास बिबवेवाडीत घडली. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या पाऊण तासामध्ये आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

असिफ दस्तगीर आत्तार (वय – 26, रा. शेळके वस्ती, बिबवेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अनारकली महंमद तेरणे (वय – 45, रा. बेळगाव, कर्नाटक) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मौलाली मंजलापुरे (वय – 31, रा. मार्केटयार्ड यांनी बिबवेवाडी) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगांवकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, असिफ यांचे काही महिन्यांपूर्वी अनारकली यांच्या मुलीसोबत लग्न झाले होते. त्यानंतर ते एकत्रित राहत असताना असिफचे सासू अनाकली यांच्यासोबत सुत जुळले. त्यामुळे असिफने अल्पवयीन मेव्हणीसह सासूला पुण्यातील बिबवेवाडीत आणले. त्या ठिकाणी शेळकेवस्तीवर भाडोत्री खोली घेऊन ते पती-पत्नीप्रमाणे राहत होते.
आठ महिने संसार केल्यानंतर त्यांच्यात घरगुती कारणावरून भांडणे होऊ लागली. त्याच रागातून शनिवारी सकाळी असिफने सासू अनारकलीचा गळा ओढणीने दाबून खून केला. त्यानंतर असिफ गुलटेकडी परिसरात असून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती हवालदार विश्वनाथ शिंदे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने गुलटेकडी परिसरातून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.