Home महत्वाची बातमी जेवण बनवण्याच्या वादातुन मित्राची हत्या… पिं

जेवण बनवण्याच्या वादातुन मित्राची हत्या… पिं

90
0

जेवण बनवण्याच्या वादातुन मित्राची हत्या…

पिंप्री खुर्द शिवारातील घटना….

 

देवानंद खिरकर

अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पिंप्री खुर्द शिवारात जेवन बनविण्याचे कारणावरुन मध्यरात्री हत्याकांड घडल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली.या हत्याकांडानंतर पळुन गेलेल्या आरोपीला पकडण्यात ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा यांना यश आलं आहे.काही तासातच अकोट ग्रामीण पोलीसांनी मोठ्या शर्तीन या आरोपींना पकडून बेड्या ठोकल्या आहेत.अकोट तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील गजानन बोदडे यांच्या शेतात सदर,संत्रांच्या झाडांची मर्यादा संपल्या असल्यानं त्याची कत्तल करण्यासाठी बाहेर गावाहून ३ शेत मजूर बोलवण्यात आले होते. संत्रा झाडाची खोड काढण्यासाठी बाहेरगावून छबुलाल भुसुम,प्रभु राजराम धीकार व रतीराम राजाराम दारशिंबे हे तीन आदिवासी मजुर आले होते.या मजुरांनी दिवसभर संत्रा झाडाची खोड काढण्याची काम केलीत.
*नेमकं त्यानंतर त्या तिघांमध्ये अस काय घडलं की एकाची हत्या करण्यात आली*
ते तिघे सोबत राहायचे आलटून पालटून स्वयंपाक करायचे.पण या रात्री स्वयंपाक कोणी करायचा या कारणावरुन तिघांनमध्ये शेतातच वाद सुरु झाला.यावेळी प्रभु राजाराम धीकार यांने रतीरामला मारहाण केल्याने तो पळुन गेला.त्यानंतर छबुलाल भुसुम यांला प्रभु राजाराम धीकार यांने कुऱ्हाडाने व लाकडांनी चांगली मारहाण केली.त्यामुळे जखमी अवस्थेत असेल्या छाबुलाल भुसुम याचा मारहाणीत जागीच मृत्यू झाल्याने प्रभू धिकार पळ काढला. त्यानंतर रतीराम हा रात्री पळून गेल्यावर सकाळी शेतात परत घटनास्थळी आल्यानंतर त्याला छबुलाल शुकलाल भुसुम ची हत्या झाली असुन मृतदेह आढळला.हत्या झाल्याची माहीती मजुर कंत्राटदार शरिफोद्दीन नशीरोद्दीन रा.अकोट याला दिल्यानंतर पोलीस पाटील, रतीराम,शेतमालक व मजुर कंत्राटदार यांनी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले.सविस्तर घटनेची माहीती घेताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या घटनेतील आरोपी प्रभु धीकार हा हत्या केल्यानंतर पळुन गेला होता.या प्रकरणी पोलीसांनी आरोपी प्रभु धीकार यांचे विरूध्द गुन्हा दाखल करून आरोपीला सोमठाणा येथुन अटक केली असुन पुढील तपास अकोट पोलीस करीत आहेत .