Home विदर्भ संचारबंदीचे उल्लंघण करीत विश्राम गृहावर निरोप समारंभाची जंगी पार्टी.

संचारबंदीचे उल्लंघण करीत विश्राम गृहावर निरोप समारंभाची जंगी पार्टी.

618
0

शासकीय अधिकार्‍यांनीच कोरोना नियमाला फासला हरताळ

ईकबाल शेख

वर्धा/ तळेगांव (शा.पं.) :- येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहावर दि. ३० एप्रिलच्या सायंकाळी सेवा निवृत्त झालेल्या आष्टि येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अधिकार्‍याला निरोप समारंभाच्या जंगी पार्टीचे आयोजन त्याच खात्यातील अधिकार्‍यासह कर्मचार्‍यांकडुन कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवुन आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे परिसरात चर्चेला उधान आले आहे. तर कोरोनाचे नियम फक्त सामान्य नागरीकांकरीताच आहे ? व शासकीय अधिकार्‍यांना सर्व सुट आहे काय ? अशी चर्चा सामान्य नागरीकांमधुन ऐकविण्यात येत आहे.

सविस्तर वृत्त असे की सार्वजनिक बांधकाम विभाग आष्टी कार्यालयातील एक अधिकारी सेवानिवृत्त झाल्याने त्याच विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी निरोप समारंभाचे तळेगांव येथे बसस्थानका शेजारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्राम गृहाच्या परिसरातील जागेत दि. ३० एप्रिलला सायंकाळच्या दरम्यान कापडी मंडप टाकुन सर्व सुसज्य व्यवस्थेसह सहभोजनासह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी तिथे साधारणत: ५० ते ६० लोकांची उपस्थिती असावी असे तिथे उभ्या असलेल्या चारचाकी व दुचाकी वाहनांच्या संख्येवरुन लक्षात येते. सध्या देशात कोरोनाचे भयावह संक्रमनाची स्थिती असुन सर्वत्र संचारबंदी करण्यात आली आहे. तरीही सर्व नियम धाब्यावर बसवुन उच्च पदस्थ अधिकार्‍याची निरोप समारंभाची पार्टी चर्चेचा विषय बनली आहे.त्यामुळे नियम काय पक्त सामान्य नागरीकांकरीताच आहे काय? असा गंभीर प्रश्न सुज्ञ नागरीक उपस्थित करीत आहे.त्यामुळे यांच्यावर आता कोण कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.