Home विदर्भ यवतमाळ न.प.चे सुलभेवार मार्केट म्हणजे एक शौकीनांनाच अड्डा

यवतमाळ न.प.चे सुलभेवार मार्केट म्हणजे एक शौकीनांनाच अड्डा

510
0

कार्यालय प्रतिनिधि

यवतमाळ नगर परिषदने स्व.मारोतरावजी सुलभेवार यांच्या नावाने नावलौकीक असलेली वास्तु म्हणजेच सुलभेवार मार्केट गेल्या अनेक वर्षापासून या मार्केट मध्ये लहान मोठे व्यावसायिक गाडे भाडे तत्वावर घेवून व्यवसाय करतात . परंतु यवतमाळ न.प. प्रशासनाच्या उदासिनतेमुळे सदर मार्केट हे दिवसेंदिवस अय्याशीचा अड्डा बनत आहे . या मार्केट मध्ये सायं. ८ नंतर भयान शांतता असते . याचाचा फायदा घेवून आंबट शौकीन , गांजा पिणारे , दारु पिणारे हे व्यावसायिकांच्या गाळ्या समोर बसून आपला शौक पूर्ण करतात . तसेच दारुच्या बाटला व्यावसायिकांच्या दुकानासमोर फोडतात . तसेच दिवसा – ढवळ्या गांजा पिणारे हे नित्याचेच झाले आहे . एखाद्या व्यावसायिकाने हटकले तर त्याच्यावरच उलटवार करणे हे काही नविन नाही . अनेकदा व्यावसायिकांनी न.प.प्रशासनाकडे सदर मार्केट मध्ये चौकीदार असावा या करीता निवेदन सुध्दा दिले परंतु या मागणीकडे न.प.ने केराची टोपलीच दाखवली हे विशेष ….
आता सदर मार्केट हे मार्केट राहीले नसून शौकीनांचा अड्डा झाले आहे . रात्र-पाळीला लहान सहान व्यावसायिकांचे दुकान हे वाऱ्यावर सोडून जावे लागते . कधी चोरी होईल . कधी शौकीनाचा हुडदंग माजेल याची धास्ती व्यावसायिकांमध्ये आहे . या करीता याकडे पोलीस प्रशासन तसेच न.प. प्रशासनाने दुर्लक्ष न करता या मार्केटकडे लक्ष देणे गरजेचे आहे . अशी येथील व्यावसायिकांची मागणी आहे .