Home बुलडाणा सह पोलीस उपनिरीक्षक प्रतापराव भुतेकर यांचा करोना संसर्गामुळे उपचारादरम्यान मृत्यू,

सह पोलीस उपनिरीक्षक प्रतापराव भुतेकर यांचा करोना संसर्गामुळे उपचारादरम्यान मृत्यू,

1076

 

पोलीस दलावर शोककळा

बुलडाणा ,

अमीन शाह ,

साखरखेर्डा
येथील पोलीस स्टेशन मध्ये चालक म्हणून कार्यरत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रताप अच्युतराव भुतेकर बक्कल नंबर 1001 यांचा आज दि 24 एप्रिल रोजी औरंगाबाद येथे करोना संसर्गामुळे दुर्देवी मृत्यू झाला आहे.
भूतेकर 13 मार्च पासून अर्जित रजेवर गेले होते त्यांच्या मुलाचे दिनांक 15/03/2021 रोजी नागपूर येथे लग्न होते 23/03/2021 रोजी पोलीस स्टेशन साखरखेर्डा येथे अर्जित रजा भोगून परत आले दुर्देवाने त्यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे ते हजर होवून लगेच गृह विलगिकरणात गेले तद्नंतर चिखली येथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने लगेच त्यांना 28 मार्च रोजी औरंगाबाद येथे भरती करण्यात आले. मात्र केले 24 एप्रिलचे दुपारी त्यांचे दुर्दैवी निधन झाले. ते 19/08/1986 साली पोलीस दलात भरती झाले होते एक वर्षांपासून ते साखरखेर्डा पोलीस ठाण्यात वाहन चालक म्हणून कार्यरत होते. असून मृत्यूसमयी ते 54 वर्षाचे होते. ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी भूतेकर यांच्या प्रकृतीसंदर्भात दररोज माहिती घेऊन पोलीस दलाकडून वाट्टेल त्या मदतीचे प्रयत्न करण्यात आले मात्र सगळे प्रयत्न निष्फळ ठरले. भूतेकर यांच्या जाण्याने पोलीस दलावर मोठा दुखःचा डोंगर कोसळला आहे भूतेकर कुटूंबियांना या दुखःतून सावरण्याची परमेश्वर संधी देवो अशा भावना जिल्हा पोलीस अधीक्षक अरविद चावरिया यांनी व्यक्त केल्या आहेत.
साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आता पर्यंत करोना संसर्गजन्य मृतांची संख्या पंधरावर गेली असून सक्रीय रुग्णांची संख्या पाचशेच्या वर जाऊन पोहोचली आहे. जनतेंनी टाळेबंदीचे पालन करण्याच्या सुचना देणारा पोलीस रखरखत्या उन्हात रस्त्यावर उभा असताना एका कर्मचाऱ्याला आज जीव गमवावा लागला त्यामुळे नागरिकांनी आतातरी टाळेबंदीचे कठोर पालन करावे असे कळकळीचे आवाहन ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी केले आहे.