Home विदर्भ उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांचा अवैध दारूविक्रेत्यावर कार्यवाही 

उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांचा अवैध दारूविक्रेत्यावर कार्यवाही 

144
0

रवींद्र साखरे . कारंजा (घाडगे)

वर्धा – संचारबंदीच सुरू असताना अवैधरित्या दारु विक्री करणार्‍या दारु अड्डयावर आर्वी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांनी छापा मारला. यात 67 हजार 730 रुपयाचा देशी, विदेशी कंपनीचा माल जप्त करण्यात आला. दारु विक्रेता धनराज कळंबे वय 65 याला अटक करण्यात आली ही कारवाई शहरातील मुख्य गोळीबार चौक परीसरात करण्यात आली.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गोळीबार चौकात अवैधरित्या दारुची विक्री होत असल्याची माहिती प मिळाली. त्या आधारे धनराज कळंबे यांच्या घराची झडती घेतली असता,घरात पलंगा खाली देशी दारूने भरलेल्या तिन खोक्यात सेवन स्टार कंपनीच्या 144 शिश्या, ह्यवर्ड्स- 500 कंपनीच्या 24 टिन,बिअर एका खोक्यात 90 Ml. च्या 187 शिष्या व एका खोक्यात 180 Ml. मॅकडॉल कंपनीच्या 40 शिश्या व चिल्लर विक्री करीता 180 एम.एल च्या सेवन स्टार कंपनीच्या देशी दारूने भरलेल्या 98 शिश्या असा 67 हजार 730 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. कोरोणाचा संसर्ग वाढत असताना देशी, विदेशी दारुची अवैध विक्री करणार्‍या धनराज कळंबे ला अटक करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनात मारोती सिडाम, भास्कर मुदगल, प्रविण देशमुख, स्वप्नील वाटकर, देशमुख यांनी केली आहे.