Home विदर्भ अट्टल बाईक चोर “आर्वी चा आलू” यास स्थानिक गुन्हे शाखे कडून अटक...

अट्टल बाईक चोर “आर्वी चा आलू” यास स्थानिक गुन्हे शाखे कडून अटक – 2 प्लेझर जप्त

181
0

पो. स्टे. वर्धा शहर

1) अप क्र.629/20 कलम 379 भा दं वि

.2) अप क्र.633/20 कलम 379 भा दं वि.

रविन्द्र साखरे

गुन्ह्याची कैफियत या प्रमाणे आहे की, फिर्यादी नामे रवींद्र वसंत जानवे, रा. आर्वी स्टॅन्ड, वर्धा यांची प्लेझर मोपेड क्र MH32-M -1950 ही दि.31.05.2020 रोजी त्यांचे घरा समोरून चोरी गेली होती.
तसेच फिर्यादी नामे अब्दुल गफ्फार कमाल उद्दीन, रा. भामटीपुरा, वर्धा यांची प्लेझर मोपेड क्र. MH32-S-1950 ही दि.28.05.2020 रोजी त्यांचे घरासमोरून चोरी गेली होती. फिर्यादीचे तक्रारी वरून पो स्टे वर्धा शहर येथे उपरोक्त गुन्हे नोंद करण्यात आले होते.
स्था. गु. शा. मार्फत सदर गुन्ह्यांचा समांतर तपास करीत असतांना दि.22.04.2020 रोजीऔ पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहिती वरून यातील आरोपीस सुनील उर्फ आलू हरिदास माहोरे (29) रा. मारोती वॉर्ड, आर्वी यास वर्धा रेल्वे स्टेशन समोरून ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता, त्याने वरील नमूद दोन्ही गुन्हे केल्याचे कबूल केले व त्याने दिलेल्या कबुली वरून त्याचे कडून नमूद गुन्ह्यातील दोन्ही प्लेझर मोपेड जप्त करण्यात आली
1) प्लेझर मोपेड क्र. MH32-M -1950 की.30,000/-
2) प्लेझर मोपेड क्र. MH32-S-1950 की.20,000/- एकुण की.50,000/- रु. चा माल हस्तगत करुन त्याला सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
सदर आरोपी हा अट्टल बाईक चोर असून त्याचे विरुद्ध पो. स्टे. वर्धा, पुलगाव व आर्वी येथे गुन्हे नोंद आहेत. त्याचे कडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
आरोपीस जप्त गाड्या व संबंधित कागदपत्रांसह पो स्टे वर्धा शहर येथे हस्तांतरित करण्यात आले आहे.
तरी सदरची माहिती आपले वृतपत्रात प्रसिद्ध होणेस विनंती आहे..
सदरची कामगिरी मा. श्री. प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक, वर्धा, पो. नि. श्री निलेश ब्राम्हणे यांचे मार्गदर्शनात स. फौं. अशोक साबळे,HC निरंजन वरभे, HC हमीद शेख, HC रंजित काकडे, अनिल कांबळे, नितेश मेश्राम,अविनाश बनसोड,अमोल ढोबाळे स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली आहे.