Home बुलडाणा लोकडाऊन ची कडक अंमलबजावणी न झाल्यास जिल्हाधिकारी यांना जवाबदार धरणार , पालकमंत्री...

लोकडाऊन ची कडक अंमलबजावणी न झाल्यास जिल्हाधिकारी यांना जवाबदार धरणार , पालकमंत्री डॉ , राजेंद्र शिंगणे ,

482

 

नागरिकांनी सहकार्य करावे ,

अमीन शाह

बुलडाणा – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी बुलडाणा जिल्ह्यामध्ये करा, असे निर्देश पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दिले. तसेच अंमलबजावणीत कुचराई झाल्यास जिल्हाधिकारी यांना जबाबदार धरू, अशी भूमिका पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी घेतली आहे.

कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. या रुग्णसंख्येवर आळा घालण्याच्या दृष्टीकोनातून मुख्यमंत्र्यांनी 14 एप्रिलच्या रात्री आठ वाजता पासून संपूर्ण महाराष्ट्रात 144 कलम लागू करून लॉकडाऊन घोषित केला आहे. या लॉकाडाऊनची कठोर अंमलबजावणी बुलडाणा जिल्ह्यात करण्याच्या दृष्टिकोनातून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांची समन्वय बैठक आज बुधवारी 14 एप्रिल रोजी बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली.