Home विदर्भ आर्वीत बाळा जगताप यांचे अभिनव आंदोलन.

आर्वीत बाळा जगताप यांचे अभिनव आंदोलन.

359

बाळा जगताप यांनी स्वतःला घेतले कोंडून गटाराच्या डंपर मध्ये..

ईकबाल शेख

वर्धा आर्वी :- शहरात भूमिगत गटार योजनेचे काम चालू आहे. त्याचवेळी काम करीत असताना शहरातील अनेक रस्ते हे पूर्वरत करून न दिल्याने थोड्याही पावसाने त्यावरून चालणे दुरापास्त झाले आहे. एवढेच नाहीतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवैध रित्या रेती भरलेले मोठ मोठी टीप्पर विनापरवाना शहरातील रस्त्यावरून विनापरवाना जात असल्याने रस्ते पूर्णत: खराब झाले आहे. दुचाकी तर सोडाच पायदळ जाणेही कठीण होऊन गेले आहे. यासंदर्भात प्रहार तर्फे वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा सुस्त प्रशासनाने काही तोडगा काढला नसल्याने आज दिनांक १५ एप्रिल रोजी प्रहारचे बाळा भाऊ जगताप यांनी या सर्व प्रकाराला वाचा फोडण्यासाठी स्वतःला गटाराच्या बंधिस्त डंपर मध्ये कोंडून घेत अभिनव_आंदोलनाचा मार्ग निवडला..
आंदोलन स्थळी नगर पालिकेचे मुख्याधिकारी, महसूल प्रशासनाचे अधिकारी यांनी भेट देऊन उदयाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या सोबत बैठक बोलावली आहे असे कळविले.. व सदर समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल असे सांगितले त्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. मात्र अजूनही यावर जर तोडगा काढला नाही तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन येत्या काळात करण्यात येईल.. ज्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल असे बाळा भाऊ जगताप यांनी सांगितले.