Home बुलडाणा शिक्षण हाच जीवनाचा प्रगतीचा मार्ग आहे ठाणेदार जितेंद्र आडोळे

शिक्षण हाच जीवनाचा प्रगतीचा मार्ग आहे ठाणेदार जितेंद्र आडोळे

257

मलकापूर पांग्रा : अमोल साळवे

डॉ. बाबासाहेबांचा शिक्षणविषयक दृष्टिकोन खूप प्रगल्भ आणि आधुनिक होता. ते स्वत: प्रतिकूल परिस्थितीतही खूप शिकले आणि शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही याचा जणू त्यांनी आदर्श घालून दिला. त्यामुळे बाबासाहेबांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा हा जो मूलमंत्र आपणास दिला त्यानुसार आपण सुद्धा शिक्षण घेऊन मोठे अधिकारी व्हा त्यासाठी भरपूर अभ्यास करा कारण शिक्षण हेच आपल्या जीवनाच्या प्रगतीचा एकमेव मार्ग आहे असे प्रतिपादन ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी केले
मलकापूर पांग्रा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 130 व्या जयंती निमित्त सोशल डिस्टंसिंग चा वापर करून अभिवादन करतात ठाणेदार आडोळे बोलत यावेळी त्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले दीप पूजा धूप पूजा केल्यानंतर पत्रकार भगवान साळवे यांनी त्रिशरण पंचशील घेतले यावेळी ग्रा प सदस्य राजू साळवे पत्रकार अमोल साळवे बीट जमादार नारायण गीते पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल बनकर पत्रकार वसीम शेख संदीप साळवे आदिनाथ साळवे दिनकर बावरे कैलास साळवे भीमराव साळवे दिलीप काकडे सरपंच बाळू पवार बाळू पैठणे डॉ रामेश्वर उबाळे ग्रापं सदस्य किरण काकडे ग्रा प सदस्य बबन काकडे विष्णू साळवे गुलाब मगर अर्जुन मगर आदीजण उपस्थित होते पांगरा येथील पुतळ्याला देखील अभिवादन करून भीम जयंती साजरी करण्यात आली पत्रकार भगवान साळवे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी माजी सरपंच भगवान उगले सरपंच पती बंडू उगले शिवव्याख्याते मधुकर लहाने दिलीप काकडे ग्रा प सदस्य किरण काकडे बबन काकडे राजू साळवे यादव टाले नामदेव उगले साबीर खान पठाण गोलू पठाण राधाकिसन देशमुख यांचेसह रंगनाथ साळवे , नारायण काकडे प्रशांत साळवे आकाश साळवे रामेश्वर गवई प्राचार्य भीमराव काकडे रवी वायाळ ,गुड्डू अंभोरे.आदी उपस्थित होते