Home बुलडाणा साखरखेर्डा पोलीसांनी पकडली गांज्याची शेती ,

साखरखेर्डा पोलीसांनी पकडली गांज्याची शेती ,

439

 

 

ओला आणि कोरडा गांजा ,

 

आरोपीस अटक

 

अमीन शाह

बुलडाणा ,

साखरखेर्डा येथील पोलीस ठाण्या हद्दीत येत असलेल्या हिवरा आश्रम शेत शिवारात एका शेतात गांजाची लागवड करण्यात आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून ठाणेदार जितेंद्र आडोळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून तीस हजार रुपये किमतीचा ओला व कोरडा गांजा जप्त केला असून या प्रकरणी शेत मालकास अटक करण्यात आली आहे ,

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार ठाणेदार जितेंद्र आडोळे यांना हिवरा आश्रम परिसरात गांजयची शेती असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्या नुसार त्यांनी आपल्या पथका सह आज दुपारी हिवरा आश्रम येथील शिवाजी शेळके यांच्या शेतात जाऊन छापा मारला असता ओला गांजयची झाड 12200 तर कोरडा गांजा पाकीट 30675 असा 42875 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी हिवरा आश्रम येथील शिवाजी शेळके यास अटक करण्यात आली असून त्याच्यावर एम पी डी ऐ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे , ही कार्यवाही मा. अरविंद चावरीया जिल्हा पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधीक्षक,बजरंग बनसोडे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार जितेंद्र आडोळे , दुय्यम ठाणेदार दीपक राणे , पो , हे , का , मुंढे , पो , का , धूड , काशपग , महिला पो , का , रमा गवई , यांच्या पथकाने केली आहे ,