Home मराठवाडा सुखापुरी तालुका अंबड येथे पोलीस चौकी उभारण्यात यावी या करिता राज्यमंत्री बच्चू...

सुखापुरी तालुका अंबड येथे पोलीस चौकी उभारण्यात यावी या करिता राज्यमंत्री बच्चू कडू यांचे गृहमंत्री अनिल देशमुख साहेब यांना शिफारस पत्र

365
0

जालना – अंबड तालुक्यामधील सुखापुरी हे एक प्रसिद्ध बाजाराचे ठिकाण आहे. मात्र येथे लोकसंख्या आणि वाढती वर्दळ कारणाने वाढणारी गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी या ठिकाणी पौलिस चौकी उभारण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे अंबड तालुका अध्यक्ष श्री राजेंद्र गायकवाड यांनी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या कडे निवेदनाव्दारे केली होती. याची दखल घेऊन बच्चुभाऊ कडू यांनी राज्याचे गृहमंत्री श्री. अनिल देशमुख यांना या सुखापुरी येथे पौलिस चौकी उभारण्यासाठी पत्र देऊन विनंती केली आहे.

याप्रसंगी श्री संतोष राजगुरु सर ( स्विय सहाय्यक ) श्री.विदुर भाऊ लाघडे (जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष जालना)यांची प्रमुख उपस्थिती होती.