Home विदर्भ टायर व स्टेपनी चोरी करणारे चोरटे स्थानीक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

टायर व स्टेपनी चोरी करणारे चोरटे स्थानीक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

254

इकबाल शेख 

वर्धा  – चंद्रशेखर अरुण काकडे, रा. वर्धा यांचे कृषी उत्पन्न बाजार समिती वर्धा येथे उभा असलेला टाटा पिक-अप चारचाकी वाहनातील स्टेपनी डिक्ससह तसेच झोपडीत ठेऊन असलेला नवीन टायर कोणीतरी अज्ञात चोरट्याने दि.०८-०४-२०२१ ते दि.०९-०४-२०२१ या दरम्यान चोरून नेले. दिनांक ११-०४-२०२१ रोजी पर्यंत सदर स्टेपनी व टायरचा फिर्यादी यांनी शोध घेतला असता मिळून न आल्याने फिर्यादी यांनी पो.स्टे.वर्धा शहर येथे दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्ह्याची तात्काळ दाखल घेवून स्थानीक गुन्हे शाखेतील पथकाने सदर गुन्ह्याचा तपास सुरु केला. सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असतांना मुखबिरव्दारे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी क्र.१) वैभव अरूनराव काकडे, वय २७ वर्ष, रा. बावापुर ता. समुद्रपुर जिल्हा वर्धा, २) सचिन दीपकराव जोगे, वय २८ वर्ष, रा. सेवा (नंदापूर), ता. समुद्रपूर, जि. वर्धा यांना ताब्यात घेवून कसून चौकशी केली असता आरोपीने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपितांना सदर गुन्ह्यात दिनांक ११-०४-२०२१ रोजी अटक करून गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल १) एक जुना वापरता टायर डिक्ससह किंमत ५,०००/- रु. २) एक नवीन टायर ट्यूब किंमत ६,०००/- रु, तसेच गुन्ह्यात वापरलेली जुनी वापरती मोटार सायकल होंडा ड्रीम युगा एमएच-४०/बीडी-६८१७ किंमत ३०,०००/- रु. असा एकूण किंमत ४१,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त करून गुन्हा उघडकीस आणला.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके यांचे मार्गदर्शनात मा. पोलीस निरीक्षक श्री निलेश ब्राम्हणे यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस अंमलदार संतोष दरगुडे, चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, राजेश तिवस्कर, प्रदीप वाघ, मनीष कांबळे, नवनाथ मुंडे तसेच सायबर सेल वर्धा यांनी केली