Home मराठवाडा महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या तरूणाचा संशयास्पद मृत्यू ! खून कि आत्महत्या ?

महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या तरूणाचा संशयास्पद मृत्यू ! खून कि आत्महत्या ?

633

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव परिसरातील भेंडाळा रोडवरील मिनाक्षी फायबर जिनिंग जवळ शेखलाल शेख चांद यांच्या शेतामधील विहिरीमध्ये रविवारी सकाळी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली .

घटनास्थळी पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलिस उपनिरीक्षक शिवसींग बहुरे ,पोलिस हवालदार रामदास केंद्रे यांनी मृतदेह विहिरीतून बाहेर काढल्यानंतर कपड्यावरून
मुर्ती येथील अशोक बाबासाहेब माळवदे रा. मुर्ती ,वय ३० याचे ते प्रेत असल्याचे नातेवाईकांनी ओळखले त्यानंतर त्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून सायंकाळी मुर्ती गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यातआले . याबाबत घनसावंगी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्युचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी सांगितले.

महिनाभरापासून बेपत्ता

अशोक माळवदे हा मुर्ती या आपल्या गावातून १८ आणि १९ मार्च रोजी कुंभार पिंपळगाव येथे दवाखान्यात जात आहे म्हणून घराबाहेर पडला होता.१९ मार्च रोजी सायंकाळी घरी परतलाच नाही.दोन दिवस शोधाशोध करूनही अशोकचा थांगपत्ता लागत नसल्याने २१ मार्च रोजी अशोक बेपत्ता झाल्याची तक्रार घनसावंगी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती . बेपत्ता झाल्यापासून अशोक तब्बल तीन आठवडे कुठे होता ?त्याचे कुणी अपहरण केले होते का ? अशोकचे बेपत्ता होण्यापूर्वी घरात, बाहेर कुणाशी भांडणवगैरे झाले होते का ? या सर्व जनसामान्यांच्या चर्चेतील प्रश्नांची उकल करणे पोलिसांपुढे आव्हान बनले आहे.अशोक माळवदे हा तसा मनमिळाऊ स्वभावाचा होता.गरिब शेतकरी कुटुंबातील सदस्य होता.त्यांचे कुणाशी वैर नसेलही परंतु अशोक माळवदेचा मृत्यू मात्र संशयास्पद बनला आहे. भेंडाळा रोडलगत असलेल्या विहिरीत किमान चार सहा दिवसांपुर्वी पासुन मनुष्य जातीचे प्रेत पाण्यात आढळून आल्याने प्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद केली,प्रेताची ओळख पटली असून मुर्ती येथील अशोक बाबासाहेब माळवदे या बेपत्ता तरूणाचे प्रेत असल्याची ओळख पटली आहे.