Home विदर्भ पातुर पोलीस स्टेशन मध्ये रमजान व 14 एप्रिल , डॉ. बाबासाहेब आंबेडकर...

पातुर पोलीस स्टेशन मध्ये रमजान व 14 एप्रिल , डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शांतता समितीची बैठक

148

प्रा.मो.शोएबोद्दीन

पातुर  / अकोला – आगामी 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच याच दिवशी सुरू होणारा रमजान हा पवित्र उत्सव योग्य पद्धतीने साजरा करण्यात यावा याकरता विचार विनिमय आणि नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून पातुर पोलीस स्टेशन मध्ये शांतता समितीची बैठक 12 एप्रिल रोजी सोमवारी सायंकाळी संपन्न झाली


यामध्ये पातुर चे ठाणेदार हरीश गवळी यांनी मार्गदर्शन करताना मिरवणुकीचे नियोजन आणि परवानगी चेआदेश शासनाकडून कुठल्याच प्रकारचे नसल्याने हे उत्सव अगदी साध्या पद्धतीने शासनाचे नियमानुसार शासनाचे नियम पाळून कुठलीही गर्दी न करता सोशल डिस्टंसिंग चे पालन करून सॅनि टायझर आणि मास्क चा वापर करून महामानवाच्या विचारांची पुस्तके विद्यार्थ्यांना तसेच वाचकांना चांगले विचार आत्मसात करण्याकरता किंवा वाचण्याकरता देऊन हा उत्सव साध्या पद्धतीने घरोघरी साजरा करण्यात यावा असे त्यांनी आवाहन केले . यावेळी पातुर चे विधिज्ञ ॲड अमजद अली काझी, नगर परिषद सदस्य हिदायत खान रूम खान , निर्भय पोहरे, बळीराम खंडारे यांच्यासह पातुर चे पत्रकार आणि पोलीस पाटील यांच्याशी चर्चा करून विचाराची आदान प्रदान करण्यात आली.
या बैठकीला पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, पोलीस कर्मचारी भवाने पोलीस पाटील निरंजन कढोणे, राजेश देशमुख ,वनिता बोचरे प्रकाश निमकंडे, साहेबराव सुरवाडे ,निर्भय पोहरे ,सागर कढोणे ,बळीराम खंडारे आदीसह पत्रकार ,पोलीस पाटील आणि शांतता समितीच्या सदस्यांची उपस्थिती होती.