Home विदर्भ आर्वी शहरात चालती फिरती पानपोई सुरु

आर्वी शहरात चालती फिरती पानपोई सुरु

39
0

गौरव जाजू मित्र परीवार चा उपक्रम

ईकबाल शेख

वर्धा – सामाजिक कार्यात अग्रेसर गौरव जाजू मित्र परीवार शहरातील असंख्य युवकाना सोबत घेऊन नेहमी नवीन जनउपयोगी उपक्रम करीत असतात. शहरातील जनतेला या सार्वजनिक उपक्रमांचा जास्तीत जास्त सरळ फायदा कसा होईल व नागरिकांना कोणत्याही पद्धतीने कशी मदद करता येईल हेच उद्देश्य सामाजिक कार्यकर्ता गौरव जाजू यांचे राहते.

याच उपक्रमा चा एक भाग म्हणून सामाजिक कार्यकर्ता गौरव जाजू द्वारे चालती-फिरती थंड पाण्याची पानपोई सुरु करण्यात आली.
ही पानपोई एका चार चाकी हाथ गाड़ी वर असून यावर सहा माठ ठेवलेले आहे. या मध्ये ठंड पानी भरुन आर्वी शहरातील मुख्य वरदळीच्या ठिकाणी व इतर रस्त्यावर फिरवून नागरिकांना थंड पानी पाजल्या जाते.
आर्वी शहरात व परिसरात अश्या प्रकारचे पहिलाच प्रयोग असल्याने ही पानपोई आकर्षनाचे केंद्र बनलेले आहे व थंड पानी पिऊन ही पानपोई मोठ्या प्रमाणात तहानल्यांची तहान भागवित आहे. ही पानपोई निर्मल उज्जवल बैंकचे विकास अधिकारी श्री नंदकिशोरजी राठी व सामाजिक कार्यकर्ता अंसार भाई यांचे हस्ते पूजन करून सुरु करण्यात आली. या वेळी गजु शिंगणे, अमित शिंगाने, गुड्डू ठाकुर, शुभम जगताप, संकेत वनस्कर,गौरव गीते, गोलू मंडावी, अभी कुबेटकर,तुषार राउत,प्रीतम लोखंडे,गजु गोंगे, विक्की पवार ,सूरज मखीजा,मोहन छंगाणी, रोहित थावली,कार्तिक पांडे,श्रवण मूधोलकार,पवन पडोले,नितिन आष्टिकर, राजेश चांडक,संदीप संकलेचा,दर्शन पुरोहित,दिनेश हरेल, रमन अग्रवाल,हितेश मेन्द्रे, शाहरुख शेख,देवेश शर्मा, बबलू शर्मा,मोहित कट्टा, अभिषेक चांडक,शारिक खान, मुन्ना छंगाणी, सुरेश जोशी इत्यादि मोठ्या संख्येनी युवा व नागरिक उपस्तिथ होते. चालती – फिरती पानपोई या उपक्रमाला यशस्वी करण्या साठी युवराज रामटेके व सुनील हिंगवे अथांग प्रयत्न करित आहेत. आर्वी शहरातील जनतेला ज्या उपक्रमनी सरळ लाभ होईल ते उपक्रम नेहमी करतच राहणार असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ता गौरव जाजू यांनी केले.