Home विदर्भ भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव, विश्वरत्न प. पू.डॉ.बाबासाहेब यांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित रक्तदान...

भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव, विश्वरत्न प. पू.डॉ.बाबासाहेब यांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात सहभाग घेण्याचे आवाहन

137

ईकबाल शेख

वर्धा – आपला सातत्याने आंबेडकरी सामाजिक चळवळीत वाटा राहिला आहे….आपल्या सामान्य आणि सच्च्या कार्यकर्त्याच्या शिरावरचं ही आंबेडकरी चळवळ उभी आहे.. धरणे आंदोलन असो की सामाजिक ,वैचारिक परिवर्तनीय कार्यक्रम असो यात आपण अमूल्य योगदान दिलेले आहे….महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची क्रांतिज्योत सतत आपल्या मनात तेवत असते याची आम्हाला जाण आहे…. आज सर्विकडे कोरोनाने उग्र रूप धारण केलेले असल्याने पुन्हा या वर्षी पण या आपदकालीन स्थितीतच आपल्याला बाबासाहेबांची जयंती ढोल, ताशा व मिरवणूक न काढता साजरी करावयाची असल्याने आर्वी व परीसरातील सर्व आंबेडकरी सामाजिक संघटनेने आपत्कालीन परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन असे ठरविण्यात आले की, रक्तदान शिबिर घेऊन, रक्तदान करून बाबासाहेबांना मानवंदना दिल्यास आपली बाबासाहेबाबद्दलची कृतज्ञता व्यक्त तर होईलच शिवाय या दानाने आपण कोणाचे तरी प्राण वाचवून जीवनदान देवू शकू…याचे फार मोठे आत्मिक समाधान आपल्याला लाभेल….त्यामुळे या दानाचे माहात्म्य लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त दिनांक १६/४/२०२१ रोज शुक्रवारला ठीक १० वाजता पासून बुद्धविहार हॉल, डॉ. आंबेडकर वॉर्ड, पाण्याच्या टाकीजवळ, आर्वी या ठिकाणी सर्व आंबेडकरी सामाजिक संघटनेच्या वतीने हे रक्तदान शिबिर आयोजित केले असून आपण सर्वतोपरी योगदान देवून सहकार्य करण्याचे आवाहन सर्व आंबेडकरी सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.