Home महाराष्ट्र “चाणक्य वार्ता” पत्रिकेच्या महाराष्ट्र विशेषांकाचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन

“चाणक्य वार्ता” पत्रिकेच्या महाराष्ट्र विशेषांकाचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन

180

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

मुंबई , दि. १९ :- चाणक्य वार्ता हे पाक्षिक साहित्याच्या माध्यमातून विविध राज्य आणि देशातील जनमानसांचे ज्ञान वृद्धिंगत करत आहे. देशातील विविध राज्यातील वैशिष्ट्यांचा मागोवा घेणाऱ्या या पाक्षिकाद्वारे राष्ट्रभावना वाढीस लागत असल्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सांगितले.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते चाणक्य वार्ता या हिंदी पाक्षिकाच्या महाराष्ट्र विशेषांकाचे प्रकाशन आज राजभवन येथे करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी राज्यपाल श्री कोश्यारी बोलत होते. या कार्यक्रमास उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते.

राज्यपाल श्री कोश्यारी म्हणाले, चाणक्य वार्ताने आजपर्यंत 25 राज्यांचे विशेषांक प्रसिद्ध केले आहेत, महाराष्ट्राची विशेषत: सांगणारा हा 26 वा अंक असून, त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे. ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी समर्पित भाव असल्यास यशप्राप्त होते. उर्वरित राज्याच्या पत्रिकाही लवकरच प्रसिदध होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. हे कार्य असेच अविरतपणे सुरू राहिल्यास राष्ट्रभावना वाढीस लागेल, असेही राज्यपाल श्री कोश्यारी यांनी सांगितले.

माजी राज्यपाल राम नाईक म्हणाले, महाराष्ट्राचे वैविध्य सांगणा-या हिंदी भाषेतील पत्रिकेचे प्रकाशन राजभवनमध्ये होणे म्हणजे दुग्धशर्करा योग आहे. चाणक्यवार्ताने देशातील विविध राज्यांना जोडण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राची संस्कृती, ऐतिहासिक, धार्मिकव दर्शनिय स्थळ, दुर्ग व किल्ले ,

महाराष्ट्राची संस्कृती, ऐतिहासिक, धार्मिकव दर्शनिय स्थळ, दुर्ग व किल्ले , महापुरूष, बॉलीवुड, शेअरमार्केट इत्यादी विषयांसमवेत राज्याचे प्रथम नागरिक या नात्याने राज्यपाल श्रीकोश्यारी यांचा जीवन प्रवासही चाणक्य वार्ता या हिंदी पत्रिकेत उलगडण्यात आला असल्याचे श्री नाईक यांनी सांगितले.

यावेळी राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते चित्रपट निर्माते मुकेश भट, सुप्रसिद्ध गायिकाअनुराधा पौडवाल, चित्रपट अभिनेत्री अरुणा इराणी, राष्ट्रसेवेसाठी शिवराज शितोले, शिक्षण सेवेसाठी मोहन सालेकर, स्वच्छता आणि कौशल्य क्षेत्रासाठी हरीश शाह, विज्ञान क्षेत्रासाठी जे.जे.रावल, वीमा व्यवसायासाठी प्रबोध ठक्कर, संगीत निर्देशनासाठी सुधा आणि विजय सिंह, वास्तुशास्त्रसाठी मुकेश मारू, पर्यावरण आणि पशु कल्याणसाठी गिरीशभाई शहा यांना आचार्य चाणक्य सन्मानप्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी विकासाच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल आणि त्यापुढील आव्हाने या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीनारायण भाला यांनी आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमास केंद्रीय हिंदी संचालनालयाचे संचालक अवनीश कुमार, समाजसेवी रविंद्र सांघवी, चाणक्यवार्ताचे संपादक डॉ. अमित जैन आदि उपस्थितहोते.