Home बुलडाणा जेष्ठ पत्रकार प्रा , मोहम्मद फारूक सर शांतिदूत सेवा रत्न पुरस्कार 2021ने...

जेष्ठ पत्रकार प्रा , मोहम्मद फारूक सर शांतिदूत सेवा रत्न पुरस्कार 2021ने सन्मानित

235

जेष्ठ पत्रकार प्रा , मोहम्मद फारूक सर शांतिदूत सेवा रत्न पुरस्कार 2021ने सन्मानित

अमीन शाह

खामगाव :- 31 जानेवारी 2021 रोजी विठ्ठल साहेब (आयपीएस) विशेष पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन वर्षापासून राष्ट्रभक्ती , शांतता , धार्मिक सलोखा ,मानसेवा , आणि निसर्ग सेवा या पाच सूत्रावर सेवारत असलेला शांतिदूत परिवार महाराष्ट्र राज्य देशात व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असून 31 जानेवारी रोजी तृतीय वर्धापन दिनाच्या औचित्याने बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील सेवानिवृत्त प्राध्यापक अंजुमन ज्युनियर कॉलेज खामगाव येथील जेष्ठ पत्रकार विशेष प्रतिनिधी लोकमत समाचार यांना शांतिदूत सेवा रत्न पुरस्कार 2021 ने सन्मानित करण्यात आले पुणे येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक नाट्यगृह नाना पेठ पुणे येथे शांती दूध सेवा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी शांतीदूत परिवाराचे आधारित फॉर्म व मार्गदर्शक माननीय श्री विठ्ठल जी जाधव साहेब संस्थापक अध्यक्ष आदरणीय विद्या ताई विठ्ठलराव जाधव शांतिदूत परिवार चे सचिव व पुणे मनपा विद्यमान नगरसेविका सौ आरतीताई कोंढारे प्रसिद्ध नेते ज्ञानेश्वर झाडबुके व अभिनेत्री माधवी मोरे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर प्रेक्षक व शांतीदूत परिवाराचे सदस्य यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला यावेळी पुणे येथे हा पुरस्कार फारुख सरांचे प्रतिनिधी यांनी स्वीकारला ,