Home विदर्भ घाटंजी तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर..!

घाटंजी तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर..!

155
0

अयनुद्दीन सोलंकी,

घाटंजी / यवतमाळ – घाटंजी तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण आज रोजी पंचायत समितीच्या सभागृहात जाहीर करण्यात आले. मात्र, महिला सरपंच पदांसाठी ४ फेब्रुवारी पर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे. दरम्यान महिला राखीव सरपंच पदासाठी यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महीला सरपंच पदाची सोडत निघणार आहे.
👉🏿 आज झालेल्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीत पंचायत समिती सभागृहात निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार पूजा माटोडे, निवडणूक अव्वल कारकून मानवटकर, पंचायत समितीचे पंचायत विस्तार अधिकारी पंजाब रणमळे आदींनी सरपंच पदाच्या आरक्षणाची प्रक्रिया पार पाडली.
गांव निहाय सरपंच पदाचे आरक्षण असे,
👉🏿 सर्वसाधारण : खापरी, पाटापांगरा, ससाणी , सावरगांव, आमडी, कुऱ्हाड, वघारा (टाकळी), डांगरगांव, तिवसाळा, माजरी, सावंगी (संगम), पंगडी, हिवरधरा, कुर्ली, कुंभारी, मारेगांव, शिरोली, जरूर, पिंपरी
👉🏿 नागरिकांचा मागास प्रवर्ग :- अंजी (नृसिंह), भांबोरा, मोवाडा, जरंग (जरुर), देवधरी, किन्ही, चांदापूर, दहेगांव, साखरा, पांढुर्णा (बु), येरंडगाव, कवठा, सगदा
👉🏿 अनुसुचित जमाती :- मांडवा, कोची, बोदडी, पांढुर्णा (खु), वासरी, मूर्ली, चोरंबा, शिवणी,
👉🏿 अनुसुचित जाती :- मानोली, पार्डी (नस्करी), सायतखर्डा, बेलोरा आदी ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
१८ जानेवारी रोजी घाटंजी तालुक्यातील ४९ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. यात २३ ग्रामपंचायत “पेसा” अंतर्गत येत असल्याने अनुसुचित जमाती करिता राखीव आहे. सरपंच पदाचे आरक्षण हे ४ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात (यवतमाळ) येथून जाहिर करण्यात येणार आहे.
👉🏿 आज झालेल्या सरपंच पदाच्या आरक्षणात निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार पूजा माटोडे, अव्वल कारकुन मानवटकर, पंचायत समितीचे पंचायत विस्तार अधिकारी पंजाब रणमले आदींनी सरपंच पदाच्या आरक्षणाचे काम पाहीले.