Home विदर्भ तळेगांव परीसरात कांदा लागवडीची धामधुम

तळेगांव परीसरात कांदा लागवडीची धामधुम

85
0

ईकबाल शेख

वर्धा – आष्टी तालुक्यात यावर्षी पाऊस मुबलक प्रमाणात झाल्याने अप्पर वर्धा धरण शंभर टक्के भरले असुन परीसरातील शेतशिवारातील विहिरिंना सुद्धा मुबलक पाणीसाठा आहे.तर नदि नाले सुद्धा अजुनपर्यंत वाहत आहे. त्यामुळेच शेतकरी मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची लागवड करत असल्याचे दिसून येत आहे.साधारणत: १५ ते २० फेब्रुवारी पर्यंत कांदा लागवड सुरू राहणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गेल्या दोन महिन्यापासून  सर्वच भागात ढगाळी वातावरण राहत असुन वातावरणात सातत्याने बदल होत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. वातावरण बदलामुळे कांद्यावर विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे. ढगाळी वातावरनाने लागवड केलेल्या कांद्याचे शेंडे पिवळसर पडत असल्याने सातत्याने औषध फवारणी कांद्यावर करावी लागत असल्याने कीटकनाशकांचा खर्च वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. कांदा उत्पादन झाल्यानंतर बाजारात शाश्वत दर मिळेल की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.