Home बुलडाणा एस टी बस ला अपघात 14 प्रवासी जखमी

एस टी बस ला अपघात 14 प्रवासी जखमी

336

 

चालकाच्या प्रसावधना मूळे मोठा अपघात टळला ,

अमीन शाह

सिंदखेडराजा ,

अचानक रोही समोर आला . त्यामुळे बस रस्त्याच्या कडेला आली . चालकाने शर्थीचे प्रयत्न करून 14 प्रवाशांना सुरक्षित ठेवल्याची घटना मलकापूर पांग्रा ( ता . सिंदखेड राजा ) जवळील कै . विजय मखमले विद्यालयासमोर आज , 21 जानेवारीला सकाळी साडेसातच्या सुमारास घडली . बसमधील 14 प्रवाशांना किरकोळ मार लागला आहे . त्यांच्यावर मलकापूर पांग्रा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून दुसऱ्या बसने रवाना करण्यात आले .

चालक आतमोहम्मद आणि वाहक विश्वंबर रामकृष्ण निकोले हे लोणार – खामगाव बस ( क्रमांक एमएच 40-8678 ) घेऊन खामगावकडे निघाले होते . मलकापूर पांग्राजवळ बस येताच अचानक रोही आडवा गेल्याने बस रस्त्याच्या कडेला आली . चालकाने शर्थीचे प्रयत्नही करूनही रस्त्याखाली बस गेली . मात्र तरीही चालकाने बरेचसे नियंत्रण मिळवल्याने बस आणि बसमधील प्रवाशांना जास्त मार लागला नाही . चालक – वाहकासह सुमेध प्रमोद शेजुळे ( 19 , रा . बिबी ) , सीमा रवींद्र मुळवकर ( 32 , रा . बिबी ) , रवींद्र राधाकिसन मुळवकर ( 35 रा . बिबी ) , लता भाऊराव बरबळे ( 42 , रा . बिबी ) , एकनाथ महादेव मुळे ( 62 , रा . बिबी ) , कांताबाई बबन गाईत ( 70 , रा . बिबी ) यांच्यासह अन्य प्रवासी किरकोळ जखमी झाले . त्यांच्यावर मलकापूर पांग्रा येथील आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले व दुसऱ्या बसने इच्छित स्थळी रवाना करण्यात आले .