Home जळगाव खानदेश उर्दू कौन्सिल जळगाव तर्फे फारुक अन्सारी यांचा “निर्भीड पत्रकार ” म्हणून...

खानदेश उर्दू कौन्सिल जळगाव तर्फे फारुक अन्सारी यांचा “निर्भीड पत्रकार ” म्हणून गौरव.

173

रावेर (शरीफ शेख)
जळगाव येथील खान्देश उर्दू कौन्सिल तर्फे मुंबई येथील अंतरराष्ट्रीय उर्दू ” दैनिक उर्दू टाइम्स”मुंबई चे निवासी संपादक फारुक अन्सारी यांना त्यांच्या सतत 33 वर्षिय उर्दु पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांच्या मुंबई येथे राज्यस्तरीय दैनिक उर्दू टाइम्स च्या पत्रकारां च्या मेळाव्यात देण्यात आले.या वेळी कौन्सिल चे अध्यक्ष अकिल खान ब्यावली, सचिव सइद पटेल यांनी फारुक अन्सारी यांनी पत्रकारिता व आपल्या लेखनी द्वारे समाज व राष्ट्र हिता साठी रंजेलेल्या गांजलेल्यान च्या न्याय हक्क व अधिकारा साठी केलेल्या निर्भीड तसेच राष्ट्र घडविण्या साठी केलेल्या उल्लेखनीय पत्रकारिता साठी “निर्भीड पत्रकार “चे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आपल्या सत्कारा उत्तर देताना फारुक अन्सारी म्हणाले की लेखनी मध्ये फार ताकद असते या द्वारे जगात कित्येक क्रान्ति घडली म्हणून लेखनी चा सदुपयोग करणे आवश्यक आहे.पुरस्काराने समाधाना बरोबर जबाबदारी हि वाटते असे मला वाटतेय. या वेळी मुस्लिम कबीर लातुर,वासिक नवेद खामगाव, आबीद हुसेन धुळे,सगीर अन्सारी गोवंडी, अफसर खान मुंबई, शहेजाद अन्सारी, अब्दुल्लाह, तौसिफ पटेल, इत्यादी उपस्थित होते.या वेळी त्यांना उस्मान जोहरी याचे कविता संग्रह “रूह ब रूह” व “खुबरुह ” भेट म्हणून देण्यात आले,

Previous articleارولہ میں مشن یوپی ایس سی رہنمائی کیمپ منعقد ہوا*
Next articleएस टी बस ला अपघात 14 प्रवासी जखमी
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.