Home विदर्भ सरपंच पदासाठी पुरुषांचे आरक्षण २ फेब्रुवारी, तर ४ फेब्रुवारी रोजी महीलांचे आरक्षण...

सरपंच पदासाठी पुरुषांचे आरक्षण २ फेब्रुवारी, तर ४ फेब्रुवारी रोजी महीलांचे आरक्षण जाहीर होणार….!

2980
0

कुर्ली येथे सतिष गड्डमवार, संजय आत्राम व मीराबाई किणाके यांची सरपंच पदासाठी दावेदारी..! 

अयनुद्दीन सोलंकी,

घाटंजी / यवतमाळ – यवतमाळ जिल्ह्यातील सरपंच पदाचे पुरुषांचे आरक्षण तहसील कार्यालयात २ फेब्रुवारी रोजी, तर महीलांचे आरक्षण जिल्हाधिकारी कार्यालयात ४ फेब्रुवारी २०२१ रोजी जाहीर होणार आहे. 

👉🏿 घाटंजी तालुक्यातील सर्वात महत्त्वाची समजली जाणारी कुर्ली येथील ग्रामपंचायत निवडणुकीत पारवा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जयप्रकाश उर्फ स्वामीबाबू काटपेल्लीवार, भाजपाचे घाटंजी तालुका व्यापारी आघाडीचे अध्यक्ष रमेश यमसनवार, डाँ. गोविंद येरावार व भाजप नेते अशोक यमसनवार यांच्या काँग्रेसचे माजी मंत्री अँड. शिवाजीराव मोघे यांच्या गटाचे ९ उमेदवार विजयी झाले आहे. दरम्यान, या निवडणुकीत मल्लेसु बोदुलवार, भाउ कुमरे यांच्या आमदार डाँ. संदीप धुर्वे व माजी आमदार अण्णासाहेब देशमुख पारवेकर गट आणि माजी सरपंच अयनुद्दीन सोलंकी, नरसिंगराव मुत्यालवार गट पराभुत झाला आहे, हे विशेष.

👉🏿 कुर्ली ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासाठी सद्यातरी सतिष लचमारेड्डी गड्डमवार, संजय तुकाराम आत्राम व मीराबाई हनमंतु किणाके आपआपली दावेदारी सांगत असले तरी, सरपंच पदाच्या निवडणुकीत रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे या निवडणुकीत सर्वात जास्त २८१ मते घेउन मीराबाई हनमंतु किणाके ही महीला निमगुडा वार्ड क्रमांक 2 मधुन अधिक मताधिक्याने विजयी झाली आहे.

👉🏿 विशेषतः सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक राज्य निवडणूक आयोगातर्फे २१ फेब्रुवारीच्या आत होण्याची शक्यता आहे. घाटंजी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीत निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार पुजा माटोडे, निवडणूक नायब तहसीलदार आर. डी. मेंढे, कुर्लीचे ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकारी विजय मेश्राम, निवडणूक लीपीक श्री. मानवटकर आदीं काम पाहत आहे.

👉🏿 एकंदरीत कुर्ली येथील सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी रस्सीखेच होणार, हे मात्र निश्चित!