Home बुलडाणा अंढेरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी गैरहजर!

अंढेरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी गैरहजर!

70
0

 

रुग्णांची हेळसांड!

हनिफ शेख

अंढेरा/प्रतिनिधी
अंढेरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत अंढेरा गावासह सेवानगर,पिंप्री आंधळे,मेंडगाव,बांयगाव,पाडळी शिंदे,शिवणी आरमाळसाह मोठ्या संख्येने गोरगरीब रुग्ण उपचार घेण्यासाठी सकाळपासुन येत असतात.परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रात काल दि.२० डिसेंबर रोजी वैद्यकीय
अधिकारी उपस्थित नसल्यामुळे रूग्णांचे मोठ्या प्रमाणात
हाल झाले. रविवारची सुटी असल्याचे कारण देत तीन-तीन वैद्यकीय अधिकारी असतानां एकही वैद्यकीय अधिकारी हजर राहत नसल्यामुळे रूग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असुन रुग्णांमध्ये रोष व्यक्त होत आहे.सेवानगर येथील रहिवाशी उमेश राठोड हा आपल्या तापेने बिमार असलेल्या लहान बाळाला(मुलीला)आपल्या पत्नीसह घेऊन आला असता सदर प्राथमिक आरोग्य केंद्र हे बंद असल्याचे दिसुन आले. तसेच वैद्यकीय आधिकारी,परिचारीका,सफाई कामगार,तसेच इतर कर्मचारी असे कोणीच हजर नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार सुरु असल्याचे समजते.दि.२०डिंसेबरला रविवार असल्याने डाँक्टर सह इतर कर्मचारी हे गैरहजर असल्याचे लक्षात आले.वास्ताविक पाहता आरोग्य सेवा ही अत्याआवश्यक सेवेत येत असल्यामुळे वैद्यकीय आधिकारी हजर असणे गरजेचे असतानां डाँ.पुजा गाताडे यांची ड्युटी असताना त्या काल गैरहजर होत्या.याबाबत त्यांना फोन केला असता त्यांनी फोन न उचलण्यातच धन्यता मानली.यासर्व प्रकारामुळे सेवानगर येथील रहिवासी उमेश राठोड यांने आपल्या लहान मुलीला पुढील उपचारासाठी खाजगी दवाखान्यात नेले.यामुळे गोरगरीब रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे.याकडे वारिष्ठ अधिकारी कामचुकार डाँक्टर व कर्मचाऱ्यांवर काय कार्यवाही करतात.याकडे लक्ष लागले आहे.