
.आरोपी विरुद्ध अट्रोसिटी गुन्हा दाखल .
——————————————————
अंढेरा प्रतिनिधी, २० डिसेंबर
बैलगाडीत बसून घरी घेऊन जातो असा बहाणा करून ३० वर्षीय युवकाने तरुणीची रस्त्यानेच छेडछाड केली . अशा मुलींच्या तक्रारी वरुण पोलिसांनी आरोपी विरुध्द कलम ३५४ (अ) , व अट्रोसिटी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे .
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील तरूणी आपल्या आई वडीला सोबत सोबत शेतात गेली होती . तरुणीच्या वडिलांनी आरोपी कडून शेताची कोळपणी करून घेतली होती आणि त्या बदल्यात आरोपीला मालाचे कुटार देण्याचे कबूल केले होते . तरुणीचे वडिल शेतात तूर काढत आहे म्हणून आरोपी हा बैलगाडी घेऊन त्यांच्या शेतात गेला आणि बैलगाडीत तुरीचे पोते टाकून घरी घेऊन जाण्यासाठी निघाला असता आरोपी याने मुलीच्या आईला म्हटले की तुमचया मुलीला गाडीत बसून द्या मी घरी घेऊन जातो असे म्हणून तरुणीच्या आईने मुलीला बैलगाडी बसून दिले . बैलगाडी समोर जाताच आरोपीने तरुणीची बैलगाडीतच छेडछाड करण्यास सुरुवात केली. हा प्रकार तरुणीने आई वडिलांना सांगीतला अशी तक्रार तरुणीने अंढेरा पोलीस स्टेशनला दाखल केली . या तक्रारी वरून ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांचया मार्गदर्शना खाली बिट अंमलदार पंजाबराव साखरे यांनी आरोपी पृथ्वीराज मनोहर शितोळे वय ३० वर्ष यांच्या विरुद्ध कलम ३५४ ,(अ), आट्रोसिटी कलम ३ (!) ,(आर), (एस), (डब्लू – !,!!) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून तपास एसडीपीओ सोनावणे दे राजा हे करीत आहे .











































