Home बुलडाणा अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निकाल घोषित करावा. ना. उदय सामंत यांच्याकडे शिवसेना विद्यार्थी...

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निकाल घोषित करावा. ना. उदय सामंत यांच्याकडे शिवसेना विद्यार्थी सेनेची मागणी. ‌

38
0

सिंदखेड राजा ,

सैय्यद तौसीफ,

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील विज्ञान,कला, वाणिज्य शाखेतील अंतिम वर्षाच्या राखून ठेवलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल त्वरित घोषित करा व पुढील शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ द्या अशी मागणी लेखी पत्राद्वारे शिवसेना विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख सागर समुद्रवार, शुभम शेलगेनवार विद्यार्थी सेना उपतालुकाप्रमुख मेहकर, कामरान इकबाल विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख सिंदखेडराजा यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे केली आहे. त्यांनी दिलेल्या पत्रात असे नमूद केले आहे की, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या निकालांमध्ये अनेक अडचणी निर्माण होऊन छोट्या छोट्या त्रुटीपोटी शेकडो विद्यार्थ्यांचे निकाल विद्यापीठाने थांबवण्याच्या अनेक तक्रारी आहेत, संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालय स्तरावर तसेच संबंधित विद्यापिठात प्रत्यक्ष जाऊन त्रुटी पूर्ण करून सुद्धा विद्यार्थ्यांचा निकाल विद्यापीठाने राखून ठेवला. तांत्रिक कारणाने निकाल राखून ठेवण्याचे कारण विद्यापीठ पुढे करून विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी खेळत आहे. सद्यस्थितीत बी.एड, एम.एस्सी,एम.ए, एम.कॉम, व इतर पुढील शैक्षणिक अभ्यासक्रम प्रवेशास प्रारंभ झाला असून अनेक शैक्षणिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रियेची मुदत सुद्धा संपत्त असून अनेक विद्यार्थ्यांना केवळ गुणपत्रिकाअभावी पुढील शिक्षणात मुकण्याची पाळी निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक हित बघता विद्यापीठाने राखून ठेवलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्वरित घोषित करावा,अशी विनंती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांच्याकडे शिवसेना विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख सागर समुद्रवार, शुभम शेलगेनवार विद्यार्थीसेना उपतालुकाप्रमुख मेहकर, कामरान इकबाल विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख सिंदखेडराजा यांनी केली आहे