Home विदर्भ मुथ्थुट फिनकॉर्प येथील चोरीचा 12 तासात छडा लावणाऱ्या पोलिसांचा सत्कार

मुथ्थुट फिनकॉर्प येथील चोरीचा 12 तासात छडा लावणाऱ्या पोलिसांचा सत्कार

65
0

योगेश कांबळे

वर्धा, दि.  18  – वर्धेतील मुथ्थुट फिनकॉर्प, गोल्ड लोन फायनान्स येथील ९ किलो सोने व नगदी ३,१०,०००/- रु. चे बॅंक रॉबरी मधील आरोपीतांना तात्काळ अटक करुन त्यांचेकडुन ४,७५,००,०००/- रु. चा मुद्येमाल जप्त केल्याबाबत नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तणपुरे,जिल्हाधिकारी, विवेक भिमनवार यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार केला.
१७ डिसेंम्बर ला सकाळी ९ चे सुमारास सदर ब्रांच मधील स्टाफ ब्रॅन्चमध्ये आल्यानंतर लगेच त्यांचे मागे एक अनोळखी इसमाने बँकेत प्रवेश करुन “कुरियर मधुन आलो शहा वकीलांचे लिफाफे दयाचे आहे” असे सांगुन सर्वांना सहया करण्याचे निमित्ताने ब्रांच मॅनेजरच्या कॅबिनमध्ये एकत्र करुन तेथील एका महिला कर्मचाऱ्यास चाकु व पिस्टलचा धाक दाखवून अंदाजे ९६०० ग्रॅम सोने नगदी ३,१०,०००/- रु. व बॅंकेमधील महिला कर्मचारी यांची ज्युपिटर मोपेड गाडी जबरीने चोरी करुन पळुन गेला. सदर घटनेबाबत फिर्यादी नामे अक्षय दिलीप खेरडे, वय २५ वर्ष, बॅंक ऑफ इंडीया कॉलोनी, वर्धा यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पो.स्टे. वर्धा शहर येथे दिनांक १७-१२-२०२० रोजी अप.क्र. 1484/2020 कलम ४५२, ३४२, ३९२, भादंवि. सहकलम ३, ४, २५ आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर अत्यंत गंभीर अश्या गुन्हयाची पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी तात्काळ दखल घेवून स्थानिक गुन्हे शाखेकडुन तपास सुरु केला. सदर गुन्हयातील घटनाक्रमाची बारकाईने चौकशी केली असता सदर बॅंकेतील शाखा प्रबंधक महेश श्रीरंग याचेवर संशय बळावल्याने त्यास ताब्यात घेवून सखोल चौकशी करण्यात आली असता शाखा प्रबंधक श्रीरंग याने गुन्हयातील आरोपी हा कुशल सरदाराम आगासे असल्याचे सांगितले. त्यावरुन पुढील तपासकामी पो.नि. निलेश ब्राम्हणे व सपोनि. महेंद्र इंगळे असे स्था.गु.शा. पथकासह तात्काळ यवतमाळ येथे रवाना झाले. त्यांनी यवतमाळ येथे जावून गुन्हयातील चारही आरोपी यांना ताब्यात घेवून चोरीतील संपुर्ण मुद्येमाल हस्तगत केला.
अत्यंत गंभीर अश्या गुन्हयाममध्ये उत्कृष्ठ कामगिरी करुन २४ तासाचे आत गुन्हा उघडकीस आणुन संपुर्ण मुद्येमाल हस्तगत केल्याबाबत मा. मंत्री प्राजक्त तणपुरे, नगरविकास व उच्च तंत्र शिक्षण राज्यमंत्री, म.रा. व मा. जिल्हाधिकारी, वर्धा व श्री विवेक भिमनवार यांचे हस्ते खालील नमुद अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला आहे. प्रशांत होळकर पोलिस अधीक्षक,पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे, सहायक पोलीस निरीक्षक श्री महेंद्र इंगळे, सहायक फौजदार सलाम कुरेशी ,पोलीस हेड कॉन्सस्टेबल प्रमोद पिसे ,नाईक पोलीस कॉन्सस्टेबल अनिल कांबळे, नाईक पोलीस कॉन्सस्टेबल राजेष जयसिंगपुरे, नाईक पोलीस कॉन्सस्टेबल पवन पन्नासे, नाईक पोलीस कॉन्सस्टेबल श्री विकास अवचट, नाईक पोलीस कॉन्सस्टेबल संघसेन कांबळे,पोलीस कॉन्सस्टेबल अभिजीत वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला.